Header Ads

१४ ते ३० नोव्हेंबर दरम्यान अनाथ बालकांना प्रमाणपत्र वितरण - Distribution of certificates to orphans between 14th to 30th November

Distribution of certificates to orphans

१४ ते ३० नोव्हेंबर दरम्यान अनाथ बालकांना प्रमाणपत्र वितरण

जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयामार्फत पंधरवडा

वाशिम, दि. ०४ (जिमाका) : जिल्ह्यात कार्यरत बालगृहातील ज्यांना कोणीही नातेवाईक नाही, तसेच ज्यांच्या कागदपत्रावर जातीचा उल्लेख नाही, अशा अनाथ बालकांकरिता तसेच इतर अनाथ बालकांकरिता अनाथ प्रमाणपत्र देण्यासाठी १४ ते ३० नोव्हेंबर २०२० या कालावधीत जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयामार्फत पंधरवडा राबविण्यात येणार आहे. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी हे वाशिम जिल्हाधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत, कक्ष क्र. २०४ येथे असून पात्र लाभार्थ्यांनी पंधरवडाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे.

No comments

Powered by Blogger.