Header Ads

Blood Donation Camp in Karanja - वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन


Blood Donation Camp in Karanja 

 वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन

परिवर्तन बहूद्देशीय संस्था, कारंजा पत्रकार मंच, कारंजा रक्तदान चळवळ आणि पंखुड़ी जमशेदपूर यांचा संयुक्त उपक्रम

5 नोव्हेंबर रोजी महेश भवन कारंजा येथे

कारंजा दि. 2 - सर्वत्र कोरोनाने थैमान घातला माणसे दूर केलीत परंतु या कोरोनाने आपल्यातली माणूसकी, आपली सहकार्य करण्याची सवय दूर केली नाही.कारण कोरोनाच काय कोणीच आपल्याकडून आपली माणूसकी हिरावून घेऊ शकत नाही. 

कॊरोनाचे संकट असल्याने अनेक गोष्टींवर याचा परिणाम दिसून येतो आहे, तसाच परिणाम नियमित होणाऱ्या  रक्तदानावर देखील झालेला आहे त्यामुळे शहरातील रक्तपेढीत सध्या सर्वच रक्तगटाचा तुटवडा निर्माण झालेला आहे. आज ज्या रक्ताची गरज थॅलसीमिया रुग्ण, कॅन्सरचे रुग्ण यांना गरज आहे तशी कधी काळी देव ना करो परंतु आपल्याला लागू शकते अनेक ऑपरेशन मध्ये वेळेवर रक्त मिळाले नाही तर रुग्णाचा जीव धोक्यात जाण्याची भीती देखील असते. 

या सर्व अत्यावश्यक गोष्टींची गरज लक्षात घेऊन या रक्तगटाच्या तुटवडा भरून काढण्यासाठी काही युवा पिढीने समोर येत परिवर्तन बहूद्देशीय संस्थेच्या माध्यमातून तसेच कारंजा पत्रकार मंच,कारंजा रक्तदान चळवळ आणि पंखुड़ी जमशेदपूर यांच्या संयुक्त विद्यमाने वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने दिनांक ५/११/२०२० रोजी स्थानिक महेश भवन कारंजा लाड येथे सकाळी १० ते २ या वेळेत रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे. कोरोना काळात झालेल्या रक्ताच्या तुटवडा भरून काढावा आणि कोणाचेही जिवीतास रक्ताच्या कमी मुळे हानी पोहचू नये याकरिता आयोजित रक्तदान शिबीरात कारंजा नगरीतील समस्त रक्तदात्यांनी आपल्या मित्र परिवारासह रक्तदान करून शिबीराची शोभा वाढवावी असे आवाहन  परिवर्तन बहूद्देशीय संस्था कारंजा लाड,कारंजा पत्रकार मंच,कारंजा रक्तदान चळवळ तसेच पंखुड़ी जमशेदपूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments

Powered by Blogger.