Header Ads

Blood Donation Camp in Karanja - रक्तदान शिबीरात 35 रक्तदात्यांनी रक्तदान करून जोपासले सामाजिक दायित्व


राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी निमित्त कारंजा येथे रक्तदान शिबीर

35 रक्तदात्यांनी रक्तदान करून जोपासले सामाजिक दायित्व

रक्तदान शिबीरात महिला रक्तदात्यांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग

    कारंजा दि.05 -  वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त कारंजा येथे आयोजित रक्तदान शिबीरात 35 रक्तदात्यांनी रक्तदान करून आपले सामाजिक दायित्व जोपासले. स्थानीक  महेश भवन येथे  आज रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या दरम्यान हे रक्तदान शिबिर पार पडले. या  शिबीराचे उद्घाटन कारंजाचे उपविभागीय अधिकारी राहुल जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी संजय पाटील, तहसिलदार धीरज मांजरे, कारंजा शहर पो स्टे चे ठाणेदार सतीश पाटील,  तालुका आरोग्य अधिकारी डाॅ किरण जाधव व डाॅ सुशील देशपांडे प्रामुख्याने उपस्थित होते. 

    शिबीरात 35  रक्तदात्यांनी रक्तदान करून आपले सामाजिक दायित्व जोपासले. परिवर्तन बहुउद्देशिय संस्था कारंजा, पत्रकार मंच कारंजा, पंखुडी जनशेदपुर झारखंड व कारंजा रक्तदान चळवळीच्या वतीने या रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.  तर संत गाडगेबाबा रक्तपेढी अमरावती ने रक्तसंकलन केेले. कोरोना काळात रक्ताचा तुटवडा पडल्याने शासनाच्या वतीने रक्तदान शिबीरे आयोजित करून रक्तसाठा जमा करण्यात यावा असे आवाहन करण्यात आले. या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद देत उपरोक्त संघटनांच्या वतीने हे रक्तदान शिबीर आयोजित केले होते. 

    आपल्या अध्यक्षीय भाषणात उपविभागीय अधिकारी राहुल जाधव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व रक्तदानाचे महत्व सांगीतले व अशा महामारीच्या काळात अत्यंत महत्वाचा कार्यक्रम राबविला त्याबद्दल परिवर्तन संस्था कारंजा पञकार मंच व रक्तदान चळवळ यांचे कौतुक करीत  वेळोवेळी असे कार्यक्रम राबवावे त्याबाबत प्रोत्साहीत केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विलास राउत यांनी तर सुञसंचलन लखन यांनी केले तर आभार  परिवर्तन बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष पंकज रोकडे यांनी मानले. सदर रक्तदान शिबीरात महिला रक्तदात्यांचाही उल्लेखनीय सहभाग दिसून आला. 

   शिबीरा दरम्यान नगराध्यक्ष शेषराव ढोके, डाॅ विजय जवाहरमलानी व डाॅ. सुशील देशपांडे यांच्यासह अनेकांनी शिबीरास भेट दिली. पञकार मंच अध्यक्ष दिलीप रोकडे, उपाध्यक्ष विजय गागरे, चाॅदभाई मुन्नीवाले, सचिव कीरण क्षार, शाम सवाई, संजय कडोळे, गजानन टोम्पे, सुनील फुलारी, महेद्र गुप्ता व पञकार मंच सर्व सदस्य, प्रज्वल गुलालकरी तसेच परिवर्तन संस्थाचे सर्व सदस्यानी अथक परिश्रम घेतले. 

No comments

Powered by Blogger.