Header Ads

25 Nov - Washim District Corona News - वाशिम जिल्ह्यात गत ३ दिवसांपासून कोरोना बाधितांचे संख्येत वाढ; आज ४० पॉजिटिव

 

 25 Nov - Washim District Corona News

२५ नोव्हे. - वाशिम जिल्ह्यात गत ३ दिवसांपासून कोरोना बाधितांचे संख्येत वाढ; आज ४० पॉजिटिव 

    वाशिम (जनता परिषद) दि.२५ -  (Washim District) वाशिम जिल्ह्यात कोरोना गत ३ दिवसांपासून वाढतच चालला असून आज ४० व्यक्ति (Corona Positive) कोरोना बाधित  म्हणून ‘तर नोंद झाली तर ०६  जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. परवा दि.२३ नोव्हेंबर रोजी १८ तर काल दि.२४ नोव्हेंबर रोजी २१ व्यक्ति हे कोरोना बाधित होते.  जिल्ह्यातील आता पर्यंतचे एकूण कोरोना बधितांची संख्या ६०२८ वर पोहोचली आहे. 

कृपया SMS ह्या त्रिसूत्री चा अवलम्ब करा.   

  1. S- Social Distancing (अंतर राखा) 
  2. M - Mask (मास्क वापरा) 
  3. S - Sanitizer (वारंवार हात धुवा)   

    काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील प्रसाद नगर येथील १, सावरगाव बर्डे येथील १, वाळकी जहांगीर येथील १, मंगरूळपीर शहरातील हुडको कॉलनी येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ६, मालेगाव शहरातील ३, काळमाथा येथील २, इराळा कॅम्प येथील ३, शिरपूर येथील १, रिसोड शहरातील जिजाऊ नगर येथील १, अनंत कॉलनी येथील १, महानंदा नगर येथील १, अण्णाभाऊ साठे चौक येथील १, शहरातील इतर ठिकाणचे २, वनोजा येथील १, बाळखेड येथील १, मानोरा तालुक्यातील पोहरादेवी येथील १, विळेगाव येथील १, वारोली येथील १, असोला खु. येथील १, कारंजा लाड शहरातील ६ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. 

तसेच जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या ६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

  • एकूण पॉझिटिव्ह – ६०२८         
  • ऍक्टिव्ह – २०८       
  • डिस्चार्ज – ५६७४             
  • मृत्यू – १४५ 

(टिप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

No comments

Powered by Blogger.