Header Ads

माजी सैनिक,पत्नी, पाल्य यांना विशेष गौरव पुरस्कार योजना - Special Pride Award Scheme for Ex-Servicemen, Wives, Children

Special Pride Award Scheme for Ex-Servicemen, Wives, Children

Special Pride Award Scheme for Ex-Servicemen, Wives, Children

 माजी सैनिक,पत्नी, पाल्य यांना विशेष गौरव पुरस्कार योजना

वाशिम, दि. २१ (जिमाका) : क्रीडा, साहित्य, संगीत, गायन, नृत्य, नाट्य व इतर कला तसेच नैसर्गिक आपत्तीमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या, यशस्वी उद्योजक, सामाजिक कार्य आणि पर्यावरण विषयक पुरस्कार मिळवणारे माजी सैनिक, पत्नी, पाल्य तसेच शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये इयत्ता १० वी व इयत्ता १२ वीमध्ये बोर्डात ९० टक्के पेक्षा अधिक गुण मिळविलेल्या, तसेच पदवी किंवा पदव्युत्तर परिक्षेत विद्यापीठात सर्वप्रथम क्रमांकाने उत्तीर्ण व आयआयटी, आयआयएम व एम्स अशा नामवंत व ख्यातीप्राप्त संस्थामध्ये प्रवेश मिळालेल्या माजी सैनिक पाल्यांना सैनिक कल्याण विभागाकडून विशेष गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

विशेष गौरव पुरस्कार योजनेसाठी पात्र असलेल्या माजी सैनिक, पत्नी, पाल्यांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात उपलब्ध असलेल्या कागदपत्रांसाठी ३१ ऑक्टोबर २०२० पूर्वी कार्यालयात संपर्क साधावा. ओळखपत्राची छायांकित प्रत, दहावी, बारावी परीक्षेच्या गुणपत्रिकेची छायांकित प्रत, चालू वर्षी शिकत असल्याचे बोनाफाईड सर्टिफिकेट, डिस्चार्ज पुस्तकात कुटुंबाची नांवे असलेल्या पानाची छायांकित प्रत, आर्थिक मदतीच्या हिरव्या कार्डची छायांकित प्रत, राष्ट्रीयकृत बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत व आधारकार्डची छायांकित प्रत, तसेच इतर क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी केल्याबद्दलचे प्रमाणपत्र सोबत आणावे, असे वाशिम जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने कळविले आहे.

No comments

Powered by Blogger.