Header Ads

Rajarshi Shahu Maharaj Merit Award - राजर्षि शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार १२ नोव्हेंबर पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

Rajarshi Shahu Maharaj Merit Award/Scholarship

Rajarshi Shahu Maharaj Merit Award/Scholarship to SC, VJNT & SBC Students of XI & XII Standard

राजर्षि शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार 

१२ नोव्हेंबर पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन 

वाशिम, दि. २१ (जिमाका) : शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागा मार्फत २००३-०४ या शैक्षणिक सत्रापासून इयत्ता १० वी व १२ वीच्या परिक्षेत विशेष उल्लेखनिय यश मिळणाऱ्या अनुसूचित जाती, विजाभज व विशेष मागास प्रवर्गाच्या मुला-मुलींना राजर्षी शाहु महाराज गुणवत्ता पुरस्कार Rajarshi Shahu Maharaj Merit Award to SC, VJNT & SBC Students of XI & XII Standard प्रदान करण्यात येतो. यंदा इयत्ता १० वी व १२ वीचे निकाल घोषित झाले असून या योजनेसाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांचे प्रस्ताव संबंधित शाळा, महाविद्यालया मार्फत १२ नोव्हेंबर २०२० पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, वाशिम यांचे कार्यालयात सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

गुणवत्ता पुरस्कारासाठी सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून प्रत्येक माध्यमिक विद्यालयात व कनिष्ठ महाविद्यालयामधून इयत्ता १० वी व १२ वीच्या परिक्षेत प्रथम आलेल्या अनुसूचित जाती, विजाभज व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांस पाच हजार रुपये रोख परितोषिक, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येते. या योजनेचा प्रस्ताव शाळा व महाविद्यालयाकडून समाज कल्याण कार्यालयात सादर करण्यात यावे. तसेच सर्व संबंधित शाळा व महाविद्यालय प्रमुख यांनी परिपुर्ण प्रस्ताव उदा. शाळा व महाविद्यालयामधून १० वी, १२ वीच्या परिक्षेत सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून प्रथम अनुसूचित जाती, विजाभज, विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांचे प्रस्ताव सादर करावा. प्रस्तावा सोबत विद्यार्थ्यास सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र, गुणपत्रिकेची सांक्षाकित प्रत, विद्यार्थांचा शाळा सोडल्याचा दाखला, मुख्याध्यापक यांचे खाते पुस्तकांची झेरॉक्स व विद्यार्थ्यांचे खाते पुस्तकांची झेरॉक्स प्रत सादर करावी.

सदर प्रस्ताव शाळा किंवा महाविद्यालयाच्या शिफारशीसह १२ नोव्हेंबर २०२० पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, वाशिम या कार्यालयात सादर करावे. जेणे करुन सदरील विद्यार्थ्यांना राजर्षी शाहु महाराज गुणवत्ता पुरस्कार Rajarshi Shahu Maharaj Merit Award/Scholarship योजनेचा लाभ देण्याबाबतची कार्यवाही करणे सोईचे होईल. कालमर्यादेत प्रस्ताव प्राप्त न झाल्यास विद्यार्थी सदर योजनेपासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ही शाळा व महाविद्यालय प्रमुखांची राहिल यांची सर्व संबंधितांनी दखल घ्यावी, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त माया केदार यांनी केले आहे.

No comments

Powered by Blogger.