Header Ads

Online job fair from tomorrow - उद्यापासून ऑनलाईन रोजगार मेळावा इच्छुक उमेदवारांनी सहभागी होण्याचे आवाहन

 

Online job fair from tomorrow
उद्यापासून ऑनलाईन रोजगार मेळावा
इच्छुक उमेदवारांनी सहभागी होण्याचे आवाहन

वाशिम, दि. २२ : Directorate of Skill Development, Employment & Entrepreneurship जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर २३ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर २०२० पर्यंत Online Job Fair ऑनलाईन पद्धतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यामध्ये उमेदवारांनी सहभाग नोंदविणे व तदनंतर कंपनी किंवा संबंधित आस्थापनांच्या उद्योजक, प्रतिनिधींकडून मुलाखत प्रक्रिया, पात्र ठरलेल्या उमेदवारांची निवड इत्यादी अनुषंगिक प्रक्रिया वेबपोर्टलवरूनच करण्यात येणार आहे, असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज यांनी कळविले आहे.

या Online Job Fair ऑनलाईन रोजगार मेळाव्यामध्ये वाशिम एम.आय.डी.सी. येथील जिजाऊ मॅन्युफॅक्चरिंग, वाशिम येथील ओम कन्सल्टंन्सी, पुणे/औरंगाबाद येथील परम स्किल्स ट्रेनिंग प्रा.लि., वाशिम येथील टेकाळे अँड असोसिएटस इत्यादी नामांकित उद्योग, कंपनीमध्ये ऑनलाईन मुलाखतीद्वारे पात्र ठरलेल्या उमेदवारांना रोजगार देणार आहेत. या मेळाव्यात ७५ पेक्षा अधिक रिक्त पदे वेबपोर्टलवर अधिसूचित झालेली असून याकरिता किमान १२ वी उत्तीर्ण इतकी शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. ऑनलाईन रोजगार मेळाव्यामध्ये सहभाग घेण्यासाठी उमेदवारांनी प्राप्त सेवायोजन कार्ड तथा एम्प्लॉयमेंट कार्डचा युझर आय.डी. व पासवर्ड वापरून सहभागी होणे आवश्यक आहे.

www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर ‘जॉब सिकर’ (Job seeker) (find a job) हा पर्याय निवडून आपल्या Employment Card  एम्प्लॉयमेंट कार्डचा युझरनेम व पासवर्ड वापरून लॉगीन करावे. नंतर डाव्या बाजूला Pandit Deendayal Upadhyay Employment Fair पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा या टॅबवर क्लिक करावे. त्यानंतर वाशिम जिल्हा निवडावा व त्यानंतर Washim Online Job Fair-3 ‘वाशिम ऑनलाईन रोजगार मेळावा-३’ (इंग्रजीमध्ये) हा पर्याय निवडावा. त्याठिकाणी आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदाखाली ‘अप्लाय’ (Apply) करावे. ‘सक्सेसफुल’ (Successful) हा हिरव्या रंगातील संदेश आल्यास आपण मेळाव्यात सहभागी झाला आहात, असे समजावे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी २३ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर २०२० कालावधीत ऑनलाईन रोजगार मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन श्रीमती बजाज यांनी केले आहे. तसेच काही समस्या असल्यास कार्यालयाच्या ०७२५२-२३१४९४ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

तरी या Online Job Fair ऑनलाईन रोजगार मेळाव्या चा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. 

No comments

Powered by Blogger.