Header Ads

ना नफा, ना तोटा तत्वावर मिळणार कोरोना साहित्य सेवा - लॉयनेस क्लब वाशीम चा स्तुत्य उपक्रम

 ना नफा, ना तोटा तत्वावर मिळणार कोरोना साहित्य सेवा

लॉयनेस क्लब वाशीम चा स्तुत्य उपक्रम

वाशीम दि ०६ - सामाजीक कार्यात अग्रसेर असलेल्या लॉयनेस क्लबच्यावतीने सेवा सप्ताहाअंतर्गत शहरासमवेत जिल्हयात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने उपाय योजना म्हणून अत्यावश्यक असलेल्या साहित्याचे ना नफा, ना तोटा या तत्वावर अल्पदरात साहित्य उपलब्ध करून देण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

स्थानिक अकोला नाका येथील चरखा कॉम्प्लेक्स येथील सुझूकी शोरूम खाली असलेल्या दुकानात मंगळवार 6 ऑक्टोंबर रोजी तिन दिवसांची प्रदर्शनी व विक्री आयोजित करण्यात असून यामध्ये जनतेला अल्पदरात पल्स ऑक्सीमीटर 500 रूपये, फेमींगो मेल-फिमेल मास्क तिन नग 100 रूपये, एननाइटी मास्क 40 रूपये, थ्री इन वन स्टीमर 150 रूपये, शंभर एमएल सॅनिटायझर 40 रूपये,  500एमएल एमएल सॅनिटायझर 150 रूपये,  डोक्यावरील लुकमास्क 30 रूपये, टेम्परेचर गन  1100 रूपये, ऑक्सीजन सिलेंंडर 450रूपयात उपलब्ध करण्यात आलेले आहे. 

या कार्यासाठी वाशीम जिल्हा माहेश्वरी संघटन, तरूण क्रांती मंच, भारतीय जैन संघटना, अकोला येथील दत्त सर्जिकल जिएमडी मार्केट  आदिंचे सुध्दा सहकार्य मिळत आहे. कोरोनावर सध्या कोणतीही लस व उपचार उपलब्ध नाहीत. त्यामुळे जनतेला आरोग्याची काळजी घेणे जरूरी आहे. याकाळात शरिरातील तापमान, ऑक्सीजन याची वारंवार तपासणी करणे, सॅनिटायझर, मास्क वापरणे हे अत्यावश्यक असून या सेवाचा लाभ घेवून तिन दिवसीय प्रदर्शनीला सर्व जनता महिलांनी भेट देण्याचे आवाहन लॉयनेस क्लबच्या अध्यक्षा सौ. ज्योती चरखा व सर्व सदस्यांनी केले आहे. 

संपूर्ण विदर्भात ठिकठिकाणी वेगवेगळया संघटनेच्या माध्यमातून ना नफा, ना तोटा या तत्वावर कोरोना अत्यावश्यक साहित्यसेवा देण्यात येत आहे. वाशीम जिल्हयात प्रथमच लॉयनेस क्लबने या सेवाकरीता विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातून पुढाकार घेतला आहे. 

No comments

Powered by Blogger.