Header Ads

Washim Corona News Today 07 Oct - जिल्ह्यात आणखी ४० कोरोना बाधित; ७० जणांना डिस्चार्ज

Maze Kutumb Mazhi Jababdari Image

Washim Corona News Today : 40 Positive

दि.०७ ऑक्टो - जिल्ह्यात आणखी ४० कोरोना बाधित; ७० जणांना डिस्चार्ज

वाशिम (जनता परिषद) दि.०७ - आज जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसा वाशिम जिल्ह्यात ४० व्यक्ती कोरोना बाधीत आले असून ७० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एकूण कोरोना बाधीतांची जिल्ह्यातील संख्या ४८१६ पर्यंत पोहोचली आहे.

काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील सिव्हील लाईन येथील १, बाहेती ले-आऊट येथील १, समर्थ नगर येथील १, संतोषी माता नगर येथील १, लाखाळा परिसरातील ६, आययुडीपी येथील २, बसस्थानक समोरील परिसरातील १, ड्रीमलँड सिटी परिसरातील २, देवपेठ येथील १, योजना कॉलनी येथील १, चांडक ले-आऊट येथील १, जुनी आययुडीपी येथील २, तामसी येथील १, सावरगाव बर्डे येथील ४, अनसिंग येथील १, मालेगाव तालुक्यातील पांगरी कुटे येथील १, मंगरूळपीर शहरातील १, सोनखास येथील १, नागी येथील १, पिंपळखुटा येथील २, हिरंगी येथील १, रिसोड शहरातील आसनगल्ली येथील १, शिवाजी नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, क्षीरसागर मळा येथील १, एकलासपूर येथील १, कारंजा लाड शहरातील २ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.

आज ७० जणांना डिस्चार्ज; १ मृत्यूची नोंद 

दरम्यान, जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या ७० व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांत जिल्ह्याबाहेर बाधित आढळलेल्या ३७ रुग्णांची नोंद आज घेण्यात आली आहे. तसेच जिल्ह्याबाहेर उपचारा दरम्यान एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची नोंद आज पोर्टलवर झाली आहे.

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

  • एकूण पॉझिटिव्ह – ४८१६
  • ऍक्टिव्ह – ६५१
  • डिस्चार्ज – ४०६७
  • मृत्यू – ९७
  • इतर कारणाने मृत्यू - १

(टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे.)

No comments

Powered by Blogger.