Header Ads

20 Oct - washim corona news - जिल्ह्यात आणखी ३२ कोरोना बाधित; ६६ जणांना डिस्चार्ज

   

Washim Corona News Today 32 Positive 

दि. २० ऑक्टो - वाशिम जिल्ह्यात आणखी ३२ कोरोना बाधित; ६६ जणांना डिस्चार्ज 

वाशिम (जनता परिषद) दि.२० - आज जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार (washim district corona) वाशिम जिल्ह्यात ३२ व्यक्ती कोरोना बाधीत आले असून ६६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एकूण कोरोना बाधीतांची जिल्ह्यातील संख्या ५४३४ पर्यंत पोहोचली आहे.

काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील रेनॉल्ड हॉस्पिटल परिसरातील १, इतर ठिकाणची १, काटा येथील १, मंगरूळपीर तालुक्यातील पांगरी येथील १, मालेगाव शहरातील वार्ड क्र. तेरा येथील १, सहारा पार्क परिसरातील १, जऊळका येथील १, मानोरा तालुक्यातील वाईगौळ येथील १, चौसाळा येथील १, रिसोड शहरतील सिटी केअर हॉस्पिटल परिसरातील ४, रिठद येथील ३, गोवर्धन येथील १, व्याड येथील १, हराळ येथील २, लोणी येथील ४, हिवरा पेन येथील १, गौंधाळा येथील ३, नागझरी येथील २, कारंजा लाड शहरातील गांधी नगर येथील १, शहा येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.

दरम्यान, जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या ६६ व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.  

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

एकूण पॉझिटिव्ह – ५४३४
ऍक्टिव्ह – ६४२
डिस्चार्ज – ४६७४
मृत्यू – ११७
(टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

No comments

Powered by Blogger.