Header Ads

17 Oct Washim Corona News Today. जिल्ह्यात आणखी ५२ कोरोना बाधित; २५ जणांना डिस्चार्ज


Washim Corona News Today 52 Positive 

दि.१७ ऑक्टो - वाशिम जिल्ह्यात आणखी ५२ कोरोना बाधित; २५ जणांना डिस्चार्ज

वाशिम (जनता परिषद) दि.१७ - आज जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम जिल्ह्यात ५२ व्यक्ती कोरोना बाधीत आले असून २५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एकूण कोरोना बाधीतांची जिल्ह्यातील संख्या ५२९२ पर्यंत पोहोचली आहे.

काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील आययुडीपी कॉलनी परिसरातील ३, पोस्ट ऑफिस जवळील १, काळे फाईल येथील २, शहरातील इतर ठिकाणची १, अनसिंग येथील ९, सावळी येथील ५, कोंडाळा येथील १, खंडाळा येथील १, मालेगाव शहरातील वार्ड क्र. अकरा येथील १, रिसोड शहरातील महानंदा कॉलनी परिसरातील २, शिक्षक कॉलनी परिसरातील १, सिटी हॉस्पिटल परिसरातील ४, बेले गल्ली येथील १, गोवर्धन येथील ३, बाळखेड येथील १, वाडी रायताळ येथील १, वाकद येथील १, कारंजा लाड शहरातील सहारा कॉलनी परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणची १, जांब येथील १, पिंपळगाव येथील ३, उंबर्डा बाजार येथील ५, सोमठाणा येथील २, झोडगा येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. 

 आज २५ डिस्चार्ज; ४ मृत्यूंची नोंद  

दरम्यान, जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या २५ व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच गेल्या काही दिवसांतील आणखी ४ मृत्यूची नोंद पोर्टलवर झाली आहे.

    कोरोना बाधितांची सद्यस्थिती

      एकूण पॉझिटिव्ह – ५२९२
      ऍक्टिव्ह – ६३८
      डिस्चार्ज – ४५४०
      मृत्यू – ११
          (टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

          No comments

          Powered by Blogger.