Header Ads

09 Oct - washim crossed 100 corona deaths - जिल्ह्यात आणखी २८ कोरोना बाधित; मृत्यु संख्येने गाठले शतक

  

Maze Kutumb Mazhi Jababdari Image

Washim Corona News Today : 28 Positive

दि.०९ ऑक्टो - जिल्ह्यात आणखी २८ कोरोना बाधित; मृत्यु संख्येने गाठले शतक 

वाशिम (जनता परिषद) दि.०९ - आज वाशिम जिल्ह्यातील कोरोना मुळे मृत्यु झालेल्यांचे संख्येने शतक गाठले. आज ४ जणांच्या मृत्यूची नोंद घेण्यात आली ज्यामुळे ही संख्या १०२ वर पोहोचली आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी अनलॉक च्या या काळात स्वत: च्या, परिवारच्या, परिसरातील नागरिकांच्या, सर्वांच्या मदतीसाठी  तसेच जीवित्वासाठी १) मास्क वापरणे  २) अंतर राखणे व ३) नियमित साबनाने हात धुनें वा सैनिटाइज़ करणे अत्यावश्यक केलेच पाहिजे.

आज जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम जिल्ह्यात २८ व्यक्ती कोरोना बाधीत आले असून २५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एकूण कोरोना बाधीतांची जिल्ह्यातील संख्या ४८९६ पर्यंत पोहोचली आहे.

काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील चंडिकावेस येथील १, कारागृह परिसरातील १, शुक्रवार पेठ येथील १, जुनी पोलीस वसाहत परिसरातील १, टिळक चौक येथील १, राजनी चौक येथील १, साई नगर येथील १, पंचशील नगर येथील १, उमरा कापसे येथील १, देपूळ येथील १, खंडाळा येथील १, मंगरूळपीर शहरातील ५, वनोजा येथील १, हिरंगी येथील ३, मोहरी येथील ४, धानोरा खुर्द येथील २, नागी येथील १, रिसोड शहरातील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.

 आज २५  जणांना डिस्चार्ज; ४ मृत्यूची नोंद 

दरम्यान, जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या २५ व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच मैराळडोह, वाघी बु., तोंडगाव आणि कारंजा लाड येथील प्रत्येकी १ व्यक्तीच्या मृत्यूची नोंद आज घेण्यात आली आहे.

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

  • एकूण पॉझिटिव्ह – ४८९६
  • ऍक्टिव्ह – ६६०
  • डिस्चार्ज – ४१३३
  • मृत्यू – १०२
  • इतर कारणाने मृत्यू - १

(टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे.)

No comments

Powered by Blogger.