मानसिक ताणतणाव व्यवस्थापन, कौटुंबिक वाद निवारण विषयी १२ सप्टेंबर रोजी वेबीनार
Webinar on Stress Management, Family Dispute Resolution
मानसिक ताणतणाव व्यवस्थापन, कौटुंबिक वाद निवारण विषयी १२ सप्टेंबर रोजी वेबीनार
वाशिम जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत आयोजन
वाशिम, दि. ०४ (जिमाका) : मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार चालू वर्ष हे ‘कौटुंबिक वाद निवारण वर्ष’ घोषित करण्यात आले असून जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्याचा प्रयत्न न्यायालयाकडून केला जात आहे. तसेच याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. सध्या कोरोना प्रादुर्भावाच्या काळात सर्वांनाच आर्थिक व कौटुंबिक स्तरावर मोठ्या प्रमाणात ताणतणावाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे प्रमुख जिल्हा न्यायायाधीश ए. जी. बिलोलीकर यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत मानसिक ताणताणाव व्यवस्थापन व कौटुंबिक वाद निवारण याविषयांवर १२ सप्टेंबर रोजी सकाळी ११.१० ते १२ वा. दरम्यान वेबीनारचे आयोजन करण्यात आले आहे.
या वेबीनारमध्ये अकोला येथील कुटुंब न्यायालयातील समुपदेशक श्रीमती कोपुलवार व वाशिम सामान्य रुग्णालयातील मनोचीकीत्सक डॉ. अवचार हे मार्गदर्शन करणार आहेत. हे वेबीनार सर्वांसाठी मोफत असून इच्छुकांनी जिल्हा विधी प्राधिकरणचे लक्ष्मण खडसे (भ्रमणध्वनी क्र. ९७६६२ १५९७२) यांच्याशी व्हाटसअपद्वारे संपर्क साधून आवश्यक माहिती घ्यावी व नाव नोंदणी करून वेबीनारचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव पी. पी. देशपांडे यांनी केले आहे.
Post a Comment