Header Ads

Washim Corona News Today 89 Positive - जिल्ह्यात 89 कोरोना बाधीत; 4 मृत्यूची नोंद

  

Corona test, Covid-19 Test

दि.21 सप्टेंबर: आज वाशिम जिल्ह्यात 89 कोरोना बाधीत; 4 मृत्यूची नोंद 

Washim Corona News Today 89 Positive

वाशिम (जनता परिषद) दि.21 - आज जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दिवसभरात वाशिम जिल्ह्यात 89 व्यक्ती कोरोना बाधीत आले आहेत यामुळे आत्तापावेतोचे एकूण कोरोना बाधीतांची जिल्ह्यातील संख्या ही 3644 पर्यंत पोहोचली आहे. आज दिवसभरात चार व्यक्तीच्या मृत्यूची नोंद आहे.

जिल्ह्यात आणखी ८९ व्यक्ती कोरोना बाधित

काल रात्री उशिरा व आज सायं. ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार 
          Washim वाशिम शहरातील सिंधी कॅम्प येथील १, नंदिपेठ येथील १, समर्थनगर येथील १, सिव्हील लाईन्स परिसरातील ५, लाखाळा परिसरातील ४, शासकीय निवासस्थान परिसरातील १, जुनी आययुडीपी परिसरातील १, राधाई ले-आऊट परिसरातील १, आययुडीपी परिसरातील १, अकोला नाका परिसरातील १, शुक्रवार पेठ परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणची १, बाभूळगाव येथील १, करंजी येथील १, काटा येथील १, टो येथील ४, खारोळा येथील १, शिरपुटी येथील २, वारला येथील १, काजळंबा येथील १, मोहजा रोड येथील १, 
      
     Risod रिसोड शहरातील पंचवडकर गल्ली येथील १, ब्राह्मण गल्ली येथील १, प्रोफेसर कॉलनी येथील १, समर्थ नगर येथील १, अयोध्या नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, रिठद येथील २, कोयाळी येथील १, भोकरखेडा येथील १, गोवर्धन येथील ४, सवड येथील २, 

         Malegaon मालेगाव शहरातील १९, अमानी येथील १०, एरंडा येथील २, पांगरी नवघरे येथील २, मुंगळा येथील ३, नागरतास येथील १, रामनगर येथील १, जऊळका येथील १, कवरदरी येथील १,   
      
         Karanja Lad कारंजा लाड तालुक्यातील कामरगाव येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. 

एकुण १०६ डिस्जार्च तर  मृत्यूंंची नोंद

          दरम्यान, जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या १०६ व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.
       तसेच चाणक्य ले-आऊट येथील ६० वर्षीय पुरुष, लाखाळा येथील ७८ वर्षीय महिला, आययुडीपी येथील ४६ वर्षीय पुरुष, मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे येथील ७२ वर्षीय पुरुषाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून त्याची नोंद आज घेण्यात येत आहे.

*कोरोना बाधितांची सद्यस्थिती*
एकूण पॉझिटिव्ह – ३६४४
ऍक्टिव्ह – ८५१
डिस्चार्ज – २७२५
मृत्यू – ६७ 
इतर कारणाने मृत्यू - १

(टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे.)

No comments

Powered by Blogger.