Header Ads

पत्रकार पांडूरंग रायकर मृत्यू प्रकरण : वाशिम जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने तिव्र निषेध

Strong protest by all journalists in Washim district
पत्रकार पांडूरंग रायकर यांचा आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे  मृत्यू
समस्त जबाबदार प्रशासकीय यंत्रणेच्या अनागोंदी कार्य पद्धतीचा 
वाशिम जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने तिव्र निषेध 

वाशिम (जनता परिषद ) दि.०३ - पुणे येथे टिव्ही ९ चे पत्रकार पांडूरंग रायकर यांना कोरोनाची लागण झाल्यावर वेळेवर ऍम्बुलन्स न मिळाल्याने उपचार अभावी त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. वास्तविकतेत प्रशासकीय व्यवस्थेच्या मोठ्या अनागोंदी कार्यभारामुळे एका तरुण, उमद्या व जनसेवा करणार्‍या पत्रकार बांधवाचा नाहक बळीच गेला आहे. राज्य शासनाच्या या आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभाराचा वाशिम जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधवांनी तीव्र निषेध केला आहे. 
आज दिनांक ३ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील विविध संघटनांच्या सर्वच पत्रकार बांधवांनी एकत्र येत याबाबत पत्रकार स्व.पांडूरंग रायकर यांच्या झालेल्या दुर्देर्वी मृत्यूचा जाहीर निषेध करीत राज्यात यापुढे असे प्रकार होऊ नये यासाठी ठोस उपाय योजना करण्यात यावी या आशयाचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री यांना वाशिमचे जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांचे माफेर्त दिले आहे. 
स्व.पांडूरंग रायकर यांच्यासारखी दुर्देवी परिस्थिती राज्यातील इतर पत्रकारांवर येवू नये यासाठी राज्य सरकारने लोकशाही राज्यघटनेतील चौथा आधारस्तंभ असलेल्या व कोरोना महामारीत आपल्या जीवाचे रान करुन वस्तूनिष्ठ पत्रकारिता करणार्‍या पत्रकारांसाठी शासनाने ठोस पाऊल उचलावी, असे निवेदनात नमुद केले आहे. 
      कोविड-१९ च्या महामारीत  जिल्ह्यातील पत्रकार सोबत असे घडल्यास पत्रकारांच्या परिवाराला किमान ५० लाखांची विमा रक्कम द्यावी. तसेच जिल्ह्यातील पत्रकारांना कोरोनाची लागण झाल्यास त्यांच्यासाठी कोविड सेंटरमध्ये खाटा राखीव असाव्यात जेणेकरुन पत्रकारांना त्रास होणार नाही. या मागण्यांची पूर्तता करुन राज्यात पत्रकारांवर अशा दुर्देवी घटना ओढविणार नाहीत यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी विनंती ही या निवेदना द्वारे करण्यात आली आहे. 

यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार परिषदचे वाशिम जिल्हाध्यक्ष माधवराव अंभोरे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष बाळासाहेब देशमुख, श्रमीक पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष नितीन पगार, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे वाशिम जिल्हाध्यक्ष पंकज गाडेकर तसेच गजानन भोयर, पवन राठी, विनोद तायडे, किशोर गोमासे, नंदकिशोर वैद्य, नंदकिशोर शिंदे, प्रमोद लक्रस, मदन देशमुख, रितेश देशमुख, अजय ढवळे, प्रा.राम धनगर, गणेश मोहळे, नाजीर शेख, गावंडे, गजानन धामणे, संदिप भातूडकर, शंकर वाघ, विठ्ठल देशमुख, रुपेश बाजड, सुवेश गिरी, आतिश देशमुख, विनोद डेरे, अमोल रघुवंशी, संदिप पिंपळकर, गजानन देशमुख, शंकरराव वाघ, सुनिल कांबळे आदी पत्रकार बांधव उपस्थित होते. 

No comments

Powered by Blogger.