Header Ads

Washim Corona News Today 66 Positive आज वाशिम जिल्ह्यात ६६ कोरोना बाधीत; २ मृत्यूची नोंद

 

Corona test, Covid-19 Test

दि.१७ सप्टेंबर: आज वाशिम जिल्ह्यात ६६ कोरोना बाधीत; २ मृत्यूची नोंद 

Washim Corona News Today 66 Positive

वाशिम (जनता परिषद) दि.१७ - आज जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दिवसभरात वाशिम जिल्ह्यात ६६ व्यक्ती कोरोना बाधीत आले आहेत यामुळे आत्तापावेतोचे एकूण कोरोना बाधीतांची जिल्ह्यातील संख्या ही ३२११ पर्यंत पोहोचली आहे. आज दिवसभरात दोन व्यक्तीच्या मृत्यूची नोंद आहे.

जिल्ह्यात आणखी ६६ व्यक्ती कोरोना बाधित

काल रात्री उशिरा व आज सायं. ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार 
          Washim वाशिम शहरातील शिव चौक येथील ५, विनायक नगर येथील १, गणेशनगर येथील १, तिरुपती पार्क परिसरातील ३, नवीन पोलीस वसाहत परिसरातील १, समर्थ नगर परिसरातील १, लाखाळा परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचा १, शिरपुटी येथील २, शेलगाव येथील २, सोनखास येथील २, देवठाणा येथील २,
       Malegaon मालेगाव शहरातील ११, सुकांडा येथील १,        Risod रिसोड महानंदा नगर येथील १, एकता नगर येथील १, अनंत कॉलनी येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, भरजहांगीर येथील १, भोरखेडा येथील १, मांगुळ झनक येथील ४, आंचळ येथील ४, पळसखेडा येथील ४, गणेशपूर येथील १, गोवर्धन येथील २, 
          Mangrulpir मंगरुळपीर येथील ४, पारवा येथील १, शेलुबाजार येथील १, पिंप्री अवगण येथील १, 
         Karanja Lad कारंजा लाड शहरातील शांतीनगर येथील १, वाल्मिकी नगर येथील ३ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे

एकुण १०२ डिस्जार्चची नोंद तर २ मृत्यू

          दरम्यान, आज जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या ६० जणांना, डिस्चार्ज देण्यात आला. तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या आणखी ४२ रुग्णांना गेल्या काही दिवसांत डिस्चार्ज मिळाला आहे. 
         अनसिंग येथील ७५ वर्षीय महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच १५ सप्टेंबर रोजी रुग्णालयात दाखल झालेल्या व त्याचदिवशी उपचारा दरम्यान मृत्यू झालेल्या मालेगाव तालुक्यातील एरंडा येथील ७२ वर्षीय व्यक्तीचा कोरोना विषयक अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

सद्यस्थिती : 
एकूण पॉझिटिव्ह – ३२११
ऍक्टिव्ह – ८२५
डिस्चार्ज – २३२८
मृत्यू – ५७
इतर कारणाने मृत्यू - ०१
(टिप : वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्हाबाहेर उपचार घेणार्‍या बाधितांची आहे.)

No comments

Powered by Blogger.