Header Ads

Washim District News : जनावरातील ‘लम्पी स्कीन डिसीज’मुळे पशुपालकांनी घाबरून जावू नये

Lampi Skin Disease In animal

Lampi Skin Disease In animal

जनावरातील ‘लम्पी स्कीन डिसीज’मुळे पशुपालकांनी घाबरून जावू नये !

जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांचे आवाहन

          वाशिम, दि. ०७ (जिमाका) : जिल्ह्यातील काही गावांमध्ये जनावरात लम्पी स्कीन डिसीज आजाराची लक्षणे आढळून येत आहेत. हा रोग विषाणूजन्य असून देवी या विषाणू गटातील आहे. हा रोग गाई व म्हशीमध्ये आढळून येतो. लहान वासरात याची तीव्रता अधिक असते. या आजारात सर्वप्रथम जनावरांच्या डोळ्यातून व नाकातून पाणी येते, ताप येतो. जनावरांच्या अंगावर १ ते ५ से. मी. आकाराच्या गाठी येतात, जनावर लंगडते, अंगाची कातडी खराब होते. या रोगाचा प्रसार गोचीड, गोमाशी, डास व चिलटे यांच्यामार्फत होतो. बाधित जनावरांच्या स्पर्शाने देखील या रोगाचा संसर्ग होवू शकतो.

          दुध पिणाऱ्या वासरांना गाईच्या दुधातून या रोगाचा प्रसार होवू शकतो. या रोगाचे नियंत्र करण्यासाठी आजारी जनावरास वेगळे बांधावे. तसेच गोठ्यात कीटकनाशक औषधांची फवारणी करावी. गोठ्यातील साहित्याचे निर्जंतुकीकरण करावे. पशुपालकाने जनावरांच्या संपर्कात आल्यास हात व कपडे स्वच्छ धुवून घ्यावे. पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क करून आजारी जनावरांवर उपचार करून घ्यावेत. रोगग्रस्त भागातून जनावरांची खरेदी व वाहतूक करू नये. सदरील रोग हा विषाणूजन्य असून योग्य उपचाराने हा रोग एकदम बरा होतो. त्यामुळे पालकांनी घाबरून जायचे कारण नाही. या रोगाचा प्रादुर्भाव माणसांना होत नाही. योग्य खबरदारी घेतलायस या रोगाचा प्रादुर्भाव कमी करता येतो. अशा प्रकारचे लक्षणे आढळून आल्यास त्वरित नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. बोरकर यांनी केले आहे.

No comments

Powered by Blogger.