Header Ads

Washim Corona News Today 7 Aug : वाशिम जिल्ह्यात ५७ पॉझिटिव्ह, एकुण संख्या ८७०, २१ जणांना डिस्जार्च

Breaking News washim corona news today 7 Aug ; karanja lad news today

दि.०७ ऑगस्ट : वाशिम जिल्ह्यात दिवसभरात ५७ पॉझिटिव्ह
 एकुण संख्या पोहोचली ८७० वर; २१ जणांना डिस्जार्च

वाशिम (जनता परिषद) दि.०७ - आज जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दिवसभरात एकूण ५७ व्यक्ती हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान लागले आहे. यामध्ये दुपारी प्राप्त अहवालानुसार ३४ तर संध्याकाळी प्राप्त अहवालानुसार २३ व्यक्ती बाधीत आढळून आल्या. तर दिवसभरात २१ व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला आहे. 

दुपारी १२.३० वाजताचे वृत्तानुसार ३४ बाधीत

काल सायंकाळी व रात्री उशिरा प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील आणखी ३४ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. यामध्ये मालेगाव तालुक्यातील मुंगळा येथील १, रिसोड येथील जिजाऊ नगर परिसरातील २, गोवर्धन येथील १, शेलू खडसे येथील १, हराळ येथील १, वाशिम येथील सुदर्शन नगर परिसरातील ३, सुंदरवाटिका येथील ५, ड्रीमलँड सिटी परिसरातील २, काळे फाईल येथील १, कारंजा लाड शहरातील सिंधी कॅम्प येथील १, विद्याभारती कॉलनी परिसरातील १, प्रियदर्शनी कॉलनी परिसरातील १, माळीपुरा येथील ३, वाणीपुरा येथील १, दादगाव येथील १, कामरगाव येथील ४, भामदेवी येथील १, मंगरूळपीर शहरातील पोस्ट ऑफिस मागील परिसरातील १, शेलूबाजार येथील २, कवठळ येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.

संध्याकाळी ०६.३० वाजताचे वृत्तानुसार २३ बाधीत

आज सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील सुदर्शन नगर येथील १, देवगाव येथील १, मंगरूळपीर शहरातील बालाजी टॉकिज परिसरातील १, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय परिसरातील १, कवठळ येथील ४, मंगळसा येथील १, कारंजा लाड शहरातील स्वस्तिक नगर येथील ३, चवरे लाईन परीसारतील २, गवळीपुरा येथील १, आखतवाडा येथील १, सोहोळ येथील १, कामरगाव येथील ५, शेवती येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.

दिवसभरात २१ व्यक्तींना डिस्जार्च

जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या मंगरूळपीर तालुक्यातील शेलूबाजार येथील १, मालेगाव शहरातील अकोला नाका परिसरातील १, वाशिम शहरातील नर्सिंग कॉलेज परिसरातील १, रिसोड शहरातील आसनगल्ली येथील १२, पठाणपुरा येथील २, मांगवाडी येथील ४ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सद्यस्थिती : एकुण रुग्ण संख्या - ८७० ऍक्टीव्ह रुग्ण - ३६१
डिस्जार्च - ४९१ मृत्यू - १७ (+१)
(टिप : वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्हाबाहेर उपचार घेणार्‍या बाधितांची आहे.)

No comments

Powered by Blogger.