Header Ads

washim corona news today 5 Aug : जिल्ह्यात दिवसभरात ०५ पॉझिटिव्ह; एकुण संख्या ७९०

washim corona news today 5 Aug : karanja lad news, malegaon, risod, manora

दि.०५ ऑगस्ट : वाशिम जिल्ह्यात दिवसभरात ०५ पॉझिटिव्ह
 एकुण संख्या पोहोचली ७९० वर; ६ जणांना डिस्जार्च

वाशिम (जनता परिषद) दि.०५ - आज जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दिवसभरात एकूण ५ व्यक्ती हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान लागले आहे. हे सर्व पाचही व्यक्ती कारंजा तालुक्यातील आहेत. 
यामुळे आजपर्यंतची वाशिम जिल्ह्याचे एकूण रुग्णांची संख्या ही ७९० झाली आहे. एक्टीव्ह रुग्ण संख्या ही ३०७ असून ४६५ व्यक्तींना डिस्जार्च करण्यात आलेले आहे. तर १७(+१) व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. 

जिल्हा प्रशासनाने संध्याकाळी ०६.३० वाजता दिलेले वृत्तानुसार ०५ बाधीत

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार, कारंजा लाड शहरातील यशवंत कॉलनी परिसरातील १, कान्नव जिन परिसरातील २, सिंधी कॅम्प परिसरातील १ व तालुक्यातील ग्राम खानापूर येथील १ असे ५ व्यक्ती हे कोरोना बाधीत असल्याचे निदान लागले आहे. 

दिवसभरात ६ व्यक्तींना डिस्जार्च

मंगरुळपीर शहरातील श्रीराम नगर परिसरातील १, शेलुबाजार येथील २, चिखली (झोलेबाबा) येथील १, बिटोडा भोयर येथील २ अशा एकूण ६ जणांना आज डिस्जार्च देण्यात आला आहे. 

सद्यस्थिती : एकुण रुग्ण संख्या - ७९० ऍक्टीव्ह रुग्ण - ३०७
         डिस्जार्च - ४६५          मृत्यू - १७ (+१)
(टिप : वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्हाबाहेर उपचार घेणार्‍या बाधितांची आहे.)

No comments

Powered by Blogger.