washim corona news today 18 Aug : जिल्ह्यात आज ११ व्यक्ती कोरोना बाधीत; एकुण संख्या १२३९ ; आज ३१ डिस्जार्च
दि.१८ ऑगस्ट : वाशिम जिल्ह्यात आज ११ व्यक्ती कोरोना बाधीत
एकुण संख्या १२३९ : आज ३१ डिस्जार्च
वाशिम (जनता परिषद) दि.१८ - आज जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दिवसभरात एकूण ११ व्यक्ती हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान लागले आहे. तर दिवसभरात ३१ व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला आहे.
आज दुपारी प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील ईश्वरी कॉलनी परिसरातील १, नंदिपेठ येथील १, देवपेठ येथील १, टिळक चौक भट्टगल्ली परिसरातील १, दत्तनगर परिसरातील १, रिसोड तालुक्यातील येवती येथील २, मंगरूळपीर तालुक्यातील शेलूबाजार येथील १, कारंजा लाड शहरातील सिंधी कॅम्प परिसरातील २, मानोरा तालुक्यातील नैनी भोयणी येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.
दरम्यान, अमरावती येथे १३ ऑगस्ट २०२० रोजी कोरोना बाधित आढळून आलेल्या कारंजा लाड शहरातील आनंद नगर (वाणीपुरा) येथील ५३ वर्षीय महिलेचा १३ ऑगस्ट रोजीच मृत्यू झाला असून त्याची नोंद आज घेण्यात येत आहे.
दिवसभरात ३१ व्यक्तींना डिस्जार्च
वाशिम शहरातील सुदर्शननगर येथील २, गणेशपेठ येथील १, दंडे चौक येथील १, देवगाव येथील २, अनसिंग येथील १, वाई येथील १, पार्डी आसरा येथील १, कारंजा लाड शहरातील वाणीपुरा येथील २, माळीपुरा येथील १, सोहळ येथील ४, सुंदरवाटिका १, मंगरूळपीर शहरातील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय परिसरातली ९, ग्रामीण रुग्णालय जवळील पाण्याची टाकी परिसरातील १, कवठळ येथील २, शेगी येथील १, मालेगाव तालुक्यातील शिरसाळा येथील १ व्यक्तीला डिस्चार्ज देण्यात आला आहे.
सद्यस्थिती : एकुण रुग्ण संख्या - १२३९ ऍक्टीव्ह रुग्ण - ३६८
डिस्जार्च - ८५० मृत्यू - २० (+१)
(टिप : वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्हाबाहेर उपचार घेणार्या बाधितांची आहे.)
Post a Comment