Nabard news - लाभार्थ्यांकडून ‘नाबार्ड’ कोणतेही शुल्क, कमिशन आकारत नाही
लाभार्थ्यांकडून ‘नाबार्ड’ कोणतेही शुल्क, कमिशन आकारत नाही
वाशिम, दि. १० (जिमाका) : राष्ट्रीय कृषि आणि ग्रामीण विकास बँक अर्थात नाबार्डची जिल्ह्यात कुठेही शाखा नाही. ‘नाबार्ड’ Nabard - National bank for agriculture and rural development ही संस्था वाशिम जिल्ह्यासह राज्यातील ३६ जिल्ह्यात केवळ जिल्हा विकास प्रबंधक या एका अधिकाऱ्याच्या माध्यमातून कार्य करते.
कुठल्याही योजनेंतर्गत ‘नाबार्ड’चा प्रत्यक्ष लाभार्थ्यांबरोबर संबंध येत नाही. तसेच कोणत्याही योजनेसाठी नाबार्ड लाभार्थ्यांकडून कोणतेही शुल्क अथवा कमिशन आकारत नाही. जिल्हा विकास प्रबंधकाव्यतिरिक्त जिल्ह्यात ‘नाबार्ड’चा कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी पदस्थापित नाही, असे ‘नाबार्ड’चे सहाय्यक महाव्यवस्थापक (जिल्हा विकास) विजय खंडरे यांनी कळविले आहे.
Post a Comment