गणेशोत्सव काळात डॉल्बी, डीजे साऊंड सिस्टीम लावण्यास मनाई : जिल्हादंडाधिकारी
Dolby-Digital Banned in Ganeshotsav
गणेशोत्सव काळात डॉल्बी, डीजे साऊंड सिस्टीम लावण्यास मनाई - जिल्हादंडाधिकारी
वाशिम, दि. १९ (जिमाका) : डॉल्बी, डीजे साऊंड सिस्टीम ह्या व्यक्तीच्या आरोग्य आणि स्वास्थ्यास अंत्यत घटक ठरू शकतात. तसेच मुंबई उच्च न्यायालयाने वेळोवेळी आदेश देवून ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) अधिनियम २००० तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियमन १९८६ मधील तरतुदीनुसार ध्वनी प्रदूषण नियमन व नियंत्रण करण्यासाठी आदेश पारित केले आहेत. पोलीस प्रशासनाला या आदेशांचे पालन करणे शक्य व्हावे, तसेच कायदा व सुव्यवस्था कायम रहावी, यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ मधील कलम १४४ (१) नुसार २२ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर २०२० या काळात संपूर्ण वाशिम जिल्ह्यात डॉल्बी, डीजे साऊंड सिस्टीमच्या वापराबाबत प्रतिबंधात्मक आदेश जिल्हादंडाधिकारी हृषीकेश मोडक यांनी निर्गमित केले आहेत.
या आदेशानुसार संपूर्ण श्रीगणेशोत्सव काळात, २२ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर २०२० रोजी गणेश विसर्जन संपेपर्यंत वाशिम जिल्ह्यामध्ये कोणत्याही डॉल्बी मालक, डॉल्बीधारक, गणेश मंडळाचे पदाधिकारी यांनी त्यांच्याकडील डॉल्बी, डीजे साऊंड सिस्टीम उपयोगात आणू नये. तसेच सदर डॉल्बी, डीजे साऊंड सिस्टीम व यंत्रसामुग्री सीलबंद ठेवण्याचे आदेश याद्वारे देण्यात आले आहेत. या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती, मंडळाचे पदाधिकारी यांच्या विरुद्ध पोलीस विभागाकडून फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
Post a Comment