Header Ads

Ban on Plastic Flag washim news today 12th Aug : प्लास्टिकपासून बनलेल्या राष्ट्रध्वजाची विक्री, वापरास सक्त मनाई

Ban on Plastic flag, Plastic Indian flag, 15th August 2020 Independance day

Ban on Sell and Use of Plastic Flag 

प्लास्टिकपासून बनलेल्या राष्ट्रध्वजाची विक्री, वापरास सक्त मनाई

           वाशिम, दि. १२ : भारतीय स्वातंत्र्य दिन अर्थात १५ ऑगस्ट रोजी विद्यार्थी, लहान मुले, व्यक्ती राष्ट्रभक्ती व उत्साहापोटी लहान आकारातील कागदी किंवा प्लॅस्टिकपासून बनलेले राष्ट्रध्वज खरेदी करतात. त्याच दिवशी सायंकाळी किंवा दुसऱ्या दिवशी हे ध्वज इतस्ततः टाकले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. प्लास्टिकपासून बनलेले हे ध्वज लवकर नष्ट होत नसल्यामुळे बरेच दिवस तेथेच पडून राहतात. त्यामुळे आपल्या हातून न कळत आपल्या राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. हा अवमान टाळण्यासाठी प्लॅस्टिकपासून बनलेले लहान राष्ट्रध्वज यांची विक्री व वापर करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने  करण्यात आले आहे.
           कार्यालये, प्रतिष्ठाने, प्राधिकरणे व इतर संस्थांनी ध्वजारोहणाच्या वेळी ध्वज वापरण्याबाबत भारतीय संहितेमध्ये दिलेल्या तरतुदींचे काटेकोरपणे पालन करावे. तसेच वापरास उपयुक्त नसलेले, फाटलेले व जीर्ण, खराब झालेले किंवा रस्त्यावर, मैदानावर पडलेले राष्ट्रध्वज गोळा करून ते तालुका स्तरावर तहसीदार कार्यालय  व जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सुपूर्द करावेत. यासाठी सर्व शाळा, महाविद्यालये, शासकीय व निमशासकीय कार्यालये, स्वयंसेवी संस्था, पालक व सर्वसामान्य नागरिकांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

मुख्य शासकीय ध्वजारोहण सकाळी ९.०५ वाजता

          १५ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी ९.०५ वाजता वाशिम येथील मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात होईल. ज्या कार्यालयाला अथवा संस्थेला ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करावयाचे आहे, त्यांनी सकाळी ८.३५ वाजेपुर्वी किंवा सकाळी ९.३५ वाजेनंतर ध्वजारोहण करावे. सकाळी ८.३५ ते ९.३५ वा. दरम्यान कोणत्याही कार्यालयाने अथवा संस्थेने ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करून नये, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत करण्यात आले आहे.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.