वाशिम येेथे लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे धडक कारवाई : महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ चे कनिष्ठ साठा अधिक्षकला लाच घेतांना रंगेहात अटक
वाशिम येेथे लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे धडक कारवाई
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ चे कनिष्ठ साठा अधिक्षकला लाच घेतांना रंगेहात अटक
वाशिम (जनता परिषद) दि.१८ - वेअर हाऊस ला जमा केलेले धान्य साठा कमी दर्शविल्यानंतर सुधारीत पावती देणेसाठी पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणार्या महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे कनिष्ठ साठा अधीक्षक यांना पैशाचे रकमेसह लाचलूचपत प्रतिबंध विभाग ने रंगेहात वाशिम येथे अटक केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
एसीबी चे वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, अनसिंग ता.वाशिम येथील तक्रारदार यांनी वेअर हाऊस ला जमा केलेले धान्य साठा अधिक्षक यांनी १०३ किलो कमी दर्शविले होते. सदर बाब तक्रारदार यांनी लक्ष्यात आणून दिली असता, आरोपी अधिक्षक यांनी सुधारित १०३ किलो ची नवीन पावती देण्यासाठी ५००० रुपये लाचेची मागणी केली.
याबाबत तक्रारदार यांनी लाचलूचपत प्रतिबंधक विभाग अमरावती यांना कळविले असता, त्यांनी काल दि.१७ ऑगस्ट २०२० रोजी सापळा रचून १८ ऑगस्ट २०२० यशस्वी कारवाई केली. यावेळी आरोपी नरेंद्र गोविंदराव सावरकर, कनिष्ठ साठा अधिक्षक यांनी ५००० रुपयांची मागणी करून स्विकारलेली रुपये ४००० ची रक्कम व नवीन पावती सह पंचा समक्ष ताब्यात घेतले. याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
या यशस्वी सापळ्यासाठी लाचलूचपत प्रतिबंधक विभाग अमरावतीचे श्रीकांत धिवरे, पोलिस अधिक्षक तसेच पंजाबराव डोंगरदिवे, अपर पोलिस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनात पथक प्रमुख एस.व्ही.शेळके, पोलिस उप अधिक्षक वाशिम, पोलिस स्टाफ ना.पो.शि. विनोद, राहुल तसेच चालक नाविद शेख यांनी कारवाई केली.
---------------------------------------------------
नागरिकांना सुचना
कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन लाच लूचपत प्रतिबंधक, विभाग वाशिम यांनी केले आहे. नागरिकांची कोणतीही तक्रार असल्यास त्यांनी मोबाईल क्रमांक ९९२१०३८१११ किंवा दुरध्वनी क्रमांक ०७२५२-२४४००२ अथवा टोल फ्रि क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा असे आवाहन लाचलूचपत प्रतिबंधक विभाग वाशिमचे पोलिस उप अधिक्षक एस.व्ही.शेळके यांनी केले आहे.
Post a Comment