Header Ads

मुदत संपलेल्या व संपणार्‍या ग्राम पंचायतींवर प्रशासक : जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या सल्ल्याने जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी करणार प्रशासकाची नियुक्ती

मुदत संपलेल्या व संपणार्‍या ग्राम पंचायतींवर प्रशास

जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या सल्ल्याने जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी करणार प्रशासकाची नियुक्ती 

मुंबई (जनता परिषद) दि.१३ - राज्यातील १९ जिल्ह्यातील १५६६ ग्राम पंचायतींची मुदत एप्रील २०२० ते जून २०२० दरम्यान समाप्त झाली आहे. १२,६६८ ग्राम पंचायतींची मुदत जुलै २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत होणार आहे. त्यामुळे या मुदत संपलेल्या ग्राम पंचायतींवर योग्य प्रशासक नेमण्याचे काम हे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या सल्ल्याने करतील असे आदेश आज ग्राम विकास विभाग, महाराष्ट्र शासन साठी अरविंद कुमार, अतिरिक्त मुख्य सचीव यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आले आहे. 
नैसर्गिक आपत्ती किंवा आणिबाणी किंवा युद्ध किंवा वित्तीय आणिबाणी किंवा प्रशासकीय अडचणी किंवा महामारी यामुळे निवडणूक घेता येणे शक्य नसेल तर महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम १९५९ चे कलम १५१ मधील पोट कलम १ मध्ये खंड (क) मध्ये प्रशासक नेमण्याची तरतुद आहे. 
प्रशासकाने गैरवर्तवणूक केल्यास, कर्तव्यात कसूर केल्यास, लांच्छनास्पद वर्तवणूक केल्यास पदावरुन दुर करण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना राहणार आहे. 

No comments

Powered by Blogger.