वाशिम जिल्हा पोलिस दलाची विनामास्क फिरणार्या विरुद्ध धडक कार्यवाही : ४३१६ केसेस करुन १३ लक्ष ७८ हजार रुपयांचे दंड वसूल
वाशिम जिल्हा पोलिस दलाची विनामास्क फिरणार्या विरुद्ध धडक कार्यवाही
४३१६ केसेस करुन १३ लक्ष ७८ हजार रुपयांचे दंड वसूल
नागरिकांनी नियमांचे पालन करावे जिल्हा पोलिस अधिक्षक वसंत परदेशी यांचे आवाहन
कारंजा (जनता परिषद) दि.०६ - आजमितीला देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. सरकारच्या सुरु झालेल्या ८अनलॉक प्रक्रियेत दरम्यान, ह्याचा संसर्ग होण्याचा प्रमाणही वाढला आहे. ग्रिन झोन मध्ये असणार्या वाशिम जिल्ह्यात कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढतच आहे. वाशिम जिल्हा पोलिस दलाने कोरोना विषाणूचा प्रसार होणेपासून रोखणेसाठी धडाकेबाज कारवाया केल्या आहेत. विविध वृत्तपत्र, वृत्तवाहिनी, व्हिडीओक्लिप प्रसारीत करुन, वेळोवेळी पथसंचलन करुन, पोलिस वाहनांद्वारे ध्वनीक्षेपकाद्वारे व्यापक जनजागृती करण्यात आली. मास्क वापरल्याने विषाणूचा संसर्ग रोखण्यास मदत होते हे वारंवार सांगण्यात आले आहे.
वारंवार आवाहन करुनसुद्धा नागरिक विनाकारण मास्क न लावता घराबाहेर फिरतात, सोशल डिस्टेंसिंगचे पालन करीत नाही व नियमांचा भंग करतात हे निदर्शनास येताच जिल्हा पोलिस अधिक्षक वसंत परदेशी यांनी कायद्याचे उल्लंघन करणार्यांचे विरोधात कायदेशीर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले. उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पाटील, यशवंत केडगे, डॉ.पवन बन्सोड यांना आपापले उपविभागात देखरेख करुन मार्गदर्शन करुन सर्वच पोलिस स्टेशनचे ठाणेदार यांना कडक कारवाई करण्याचे आदेश दिलेत.
या अनुषंगाने जिल्ह्यात लॉकडाऊन व अनलॉक प्रक्रिया सुरु झाल्यापासून आतापावेतो विनामास्क फिरणार्या विरुद्ध कडक कारवाई केली. या दरम्यान ४३१६ केसेस करुन १३ लाख ७७ हजार ४०० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. त्याचप्रमाणे संचारबंदी काळात नियमभंग संदर्भाने २७४४ केसेस दाखल करुन त्यात २४८ प्रकरणात शिक्षा लावण्यात आली. दारुबंदी कायद्या अंतर्गत ५९६ गुन्हे नोंद करुन एकुण ४६,८०,२९/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगार कलमान्वये ६१ गुन्हे नोंद करुन १०,४३,४२६/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संचारबंदी दरम्यान एकूण ८९५ वाहने जप्त करुन, सोशल डिस्टेंसिंगचे उल्लंघन करुन ट्रिपलसिट जाणार्या ८७२ दुचाकी वाहन धारकांवर कार्यवाही करण्यात आली.
नागरिकांनी नियमांचे पालन करावे पोलिस अधिक्षक वसंत परदेशी यांचे आवाहन
नमुदप्रमाणे कायदेशीर व दंडात्मक कार्यवाही करण्यामागे जनतेला त्रास देण्याचा हेतू नसून जनतेचा कोव्हीड १९ विषाणू प्रादूर्भावास प्रतिबंध करणे हाच एकमेव उद्देश आहे. जनतेचे सहकार्य असेल तर वाशिम जिल्ह्यात होणारा कोरोनाचा वाढता प्रादूर्भाय कमी करण्यास मदतच होईल. त्यामुळे जनतेने अत्यावश्यक सेवासाठीच घराबाहेर पडावे. विनाकारण इकडे तिकडे फिरु नये, घराबाहेर पडणे गरजेचे असेल तेव्हा मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टेंसिंगच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे, स्वत:च्या व कुटुंबियांच्या आरोग्य सुरक्षेची संपूर्ण खबरदारी घ्यावी. वैद्यकीय चमु, जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन यांचेकडून देण्यात येणार्या सुचनांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा पोलिस अधिक्षक वसंत परदेशी यांनी जनतेला केले आहे.
Post a Comment