दि.१० जुलै : वाशिम जिल्ह्यात संध्याकाळी ८ पॉझिटिव्ह :आज सकाळचे १ बाधीतसह एकूण ९ पॉझिटिव्ह
दि.१० जुलै : वाशिम जिल्ह्यात संध्याकाळी ८ पॉझिटिव्ह
आज सकाळचे १ बाधीतसह एकूण ९ पॉझिटिव्ह
वाशिम (जनता परिषद) दि.१० - आज संध्याकाळी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ८ व्यक्तींची कोरोना बाबत चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे. यामुळे सकाळचे एक व्यक्तीसह आज दिवसभरात एकूण ९ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.मंगरुळपीर शहरातील संभाजी नगर परिसरातील ४ वर्षीय मुलगी, ५४ वर्षीय महिला, सोनखास परिसरातील ३१ वर्षीय महिला, गवळीपुरा परिसरातील ३० वर्षीय व बढाईपुरा परिसरातील ४९ वर्षीय व्यक्ती अशा ५ व्यक्ती कोरोना बाथीत आल्या आहेत.
कारंजा शहरातील सिंधी कॅम्प परिसरातील ४५ वर्षीय पुरुष व आनंदनगर परिसरातील ५२ वर्षीय महिला व २ वर्षीय मुलीचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे.
सकाळी रिसोड येथील व्यक्ती आली होती पॉझिटिव्ह
सकाळी मिळालेल्या माहितीनुसार, इंदिरा नगर रिसोड येथील २९ वर्षीय व्यक्ती पॉझिटिव्ह आला होता. यामुळे सकाळचे १ व संध्याकाळचे ८ व्यक्ती सह आज जिल्ह्यात एकूण ९ व्यक्ती कोरोनाबाधीत आले आहेत.
नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे असून मास्क लावणे, सोशियल डिस्टंसिंगचे पालन करणे, वारंवार हात धुणे तसेच गर्दी टाळणे व अनावश्यक मुक्त संचार न करता प्रशासनास सहकार्य करणे स्वरक्षणार्थ गरजेेचे आहे.
Post a Comment