Header Ads

दि.१३ जुलै : वाशिम जिल्ह्यात संध्याकाळी ७ व्यक्ती पॉझिटिव्ह

दि.१३ जुलै : वाशिम जिल्ह्यात संध्याकाळी ७ व्यक्ती पॉझिटिव्ह 

वाशिम (जनता परिषद) दि.१३ - आज सायंकाळी ७ व्यक्तींचे कोरोना विषयक अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये मालेगाव तालुक्यातील १ व वाशिम तालुक्यातील ६ व्यक्तींचा समावेश आहे. 
     सकाळी आलेले वृत्तानुसार मंगरुळ येथील ६५ वर्षीय वृद्ध चा मृत्यृ झाला होता, तो ही पॉजिटिव आला होता.  त्यामुळे आज दिवसभरात एकूण ८ व्यक्ति पॉजिटिव आल्या आहेत. 
वाशिम शहरातील गवळीपुरा परिसरातील २, ध्रुव चौक परिसरातील १, फकीरपुरा परिसरातील १, नगरपालिका निवासस्थाने परिसरातील १ अशा पाच व्यक्ती कोरोना बाधित आढळल्या आहेत. तसेच ब्राह्मणवाडा (ता. वाशिम) आणि पांगरी कुटे (ता. मालेगाव) येथील प्रत्येकी एका व्यक्तीलाही कोरोना संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे.
सद्यस्थितीत एकूण पॉझिटिव्ह २५३ असून; उपचार घेत असलेले म्हणजेच ऍक्टिव्ह रुग्ण हे १३९  आहेत. बरे झालेल्यांची संख्या ही १०७ असून सर्वांना डिस्जार्च देण्यात आलेला आहे. तर एकुण ०७ जणांचा मृत्यू झालेला आहे. यामध्ये जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेत असलेल्या कोरोना बाधितांची संख्याही निहीत आहे.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.