Header Ads

दि.१४ जुलै : वाशिम जिल्ह्यात आज एकुण २१ पॉझिटिव्ह : एकुण संख्या पोहोचली २७४ वर

दि.१४ जुलै : वाशिम जिल्ह्यात आज एकुण २१ पॉझिटिव्ह : एकुण संख्या पोहोचली २७४ वर

मंगरुळपीर तालुक्यात कोरोनाचा स्फोट : १४ पॉझिटिव्ह 

वाशिम (जनता परिषद) दि.१४ - आज वाशिम जिल्ह्यात सकाळी १२.०० वाजता ५ व तद्नंतर सायंकाळी ०६.०० वाजता १६ व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल हे पॉझिटिव्ह आल्याने एकूण २१ पॉझिटिव्ह आज वाशिम जिल्ह्यात झाले आहेत. यामुळे आता कोरोनाचा उद्रेक होतो की काय ? असे चिंतेचे वातावरण नागरिकांसह प्रशासनासही वाटू लागले आहे. विशेष म्हणजे या २१ मध्ये १४ व्यक्ती ह्या मंगरुळपीर तालुक्यातील आहेत. यामुळे मंगरुळपीर हे कोरोनाचे बाबतीत मोठे हॉटस्पॉट बनत चालले आहे.  
आज संध्याकाळी मिळालेल्या माहितीनुसार, मंगरुळपीर तालुक्यातील १४ व्यक्तींचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.  यात शहरातील मंगलधाम परिसरातील ३, संभाजी नगर परिसरातील २, गवळीपुरा परिसरातील २, पंचशील नगर परिसरातील १ तर तालुक्यातील ग्राम चिखली येथील ६ व्यक्तींचा समावेश आहे. तर वाशिम शहरातील २ व्यक्ती पॉझिटिव्ह आल्यात ज्या स्थानीक गोटे कॉलेज परिसरातील आहेत. हे सर्वचजण यापुर्वीच्या कोरोना बाधितांच्या संपर्कातील आहेत. 
तर दुपारी १२.०० वाजता प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यातील ५ व्यक्ती कोरोनाबाधीत आढळून आल्यात. यामध्ये कारंजा शहरातील माळीपुरा परिसरातील ३ तर मालेगांव शहरातील शेलू फाटा परिसरातील १ व नागरतास रोड परिसरातील १ व्यक्तीचा समावेश आहे. 

५ व्यक्ती बरे झाल्याने देण्यात आला डिस्जार्च 

दिलासादायक म्हणजे, आज ५ व्यक्तींना बरे झाल्याने डिस्जार्च देण्यात आला. यामध्ये मालेगांव तालुक्यातील २ तर वाशिम, मंगरुळपीर व रिसोड तालुक्यातील प्रत्येकी १ व्यक्तीचा समावेश आहे. 
सद्यस्थितीत एकूण पॉझिटिव्ह २७४ असून यांतील १५५ जणांवर उपचार सुरु आहेत. ११२ व्यक्ती ह्या डिस्जार्च झाल्या असून एकुण ७ व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे. यामध्ये जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेत असलेल्या कोरोना बाधीतांचा समावेश आहे.

No comments

Powered by Blogger.