Header Ads

कारंजात कोरोनाचा दुसरा बळी : उपचारा दरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू वाशिम जिल्ह्यात रात्री ६ पॉझिटिव्ह : आज एकुण १७ पॉझिटिव्ह

कारंजात कोरोनाचा दुसरा बळी 

उपचारा दरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू 

वाशिम जिल्ह्यात रात्री ६ पॉझिटिव्ह : आज एकुण १७ पॉझिटिव्ह

     कारंजा (जनता परिषद) दि.०७- आज रात्री ८.३० वाजता जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, कारंजा लाड येथील सारीची तिव्र लक्षणे असणार्‍या एका ६६ वर्षीय व्यक्तीचा काल रात्री उशीरा उपचारा दरम्यान वाशिम येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला. सदरहू व्यक्ती ही आनंद नगर येथील रहिवासी आहे. ४ जुलै रोजी त्या व्यक्तीला उपचारासाठी कारंजा येथे दाखल केले होते. त्याच दिवशी वाशिम येथे शिफ्ट करुन ५ जुलै रोजी सदरहू व्यक्तीचा स्वॅब हा कोरोना विषयक चाचणी साठी पाठविण्यात आला होता. मात्र उपचारा दरम्यान त्याचे ६ जुलै रोजी निधन झाले. आज प्राप्त अहवालांमध्ये सदरहू व्यक्तीचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे आता हि व्यक्ती कारंजातील कोरोनाचा दुसरा बळी ठरला आहे. 
दरम्यान आता रात्री प्राप्त १२ अहवालांमध्ये ६ निगेटिव्ह तर ६ पॉझिटिव्ह आले आहेत. कारंजातील ह्या मृत पावलेल्या व्यक्ती समवेत वाशिम शहरातील हकीम अली नगर परिसरातील ६५ व ३३ वर्षीय पुरुष, २५ व ६० वर्षीय महिला यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हे सर्वजन अकोला येथे उपचार घेत असलेल्या बाधीताच्या संपर्कातील आहेत. तसेच सारीची लक्षणे असलेला कुंभारपुरा परिसरातील ६९ वर्षीय पुरुष कोरोना बाधीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. 
सकाळचे ११ व आता आलेले ६ असे एकुण १७ पॉझिटिव्ह आज एकाच दिवशी आढळून आले आहेत. यामुळे जिल्ह्यात चिंंता वाढली आहे. 

No comments

Powered by Blogger.