Header Ads

‘महाडीबीटी’ पोर्टलवरील शिष्यवृत्ती व इतर योजनांच्या अर्जांवर कार्यवाही करण्यास १७ जुलैपर्यंत मुदतवाढ

‘महाडीबीटी’ पोर्टलवरील शिष्यवृत्ती व इतर योजनांच्या अर्जांवर कार्यवाही करण्यास १७ जुलैपर्यंत मुदतवाढ

     वाशिम (जनता परिषद) दि. ०८ : सन २०१८-१९ पासून महाराष्ट्र शासनातर्फे सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी https://mahadbtmahait.gov.in हे पोर्टल माहिती व तंत्रज्ञाना यांच्यातर्फे कार्यरत करण्यात आले आहे. या संकेतस्थळावर सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षाकरिता अनुसूचित जाती, विजाभज, इमाव आणि विमाप्र या प्रवर्गासाठी राबविण्यात येणाऱ्या मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी योजना व इतर ऑनलाईन झालेल्या योजनांकरिता विद्यार्थ्यांनी भरलेल्या ऑनलाईन अर्जांवर कार्यवाही करण्यास १७ जुलै २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. https://dbtworkflow.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर नोटीस विभागामध्ये याबाबतची सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.
     जिल्ह्यातील सर्व प्राचार्य, मुख्याध्यापक यांनी आपल्यास्तरावरून सर्व विद्यार्थ्यांचे https://dbtworkflow.mahaonline.gov.in या महाडीबीटी पोर्टलच्या पडताळणी लॉगीनमधून अर्जांची शासन निर्णयानुसार पडताळणी करून पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज दिलेल्या वेळेत समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालयाकडे ऑनलाईन पाठवावे. जेणेकरून सर्व अर्ज तपासून पुढील कार्यवाही करणे सोपे होईल. या योजनांच्या पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालय स्तरावरून प्रलंबित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्राचार्य, मुख्याध्यापक यांची राहील, असे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त माया केदार यांनी कळविले आहे.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.