Header Ads

Dr.Sujit Somani appointed as National Vice President of Ayush International Medical Association

Dr. Sujit Somani Washim

आयुष आंतरराष्ट्रीय मेडीकल असोशिएशनच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी वाशिमचे डॉ. सुजित सोमाणी

     वाशीम दि.१५ -  येथील प्रसिध्द आयुर्वेद तज्ञ तथा डॉक्टर सोमाणी क्लिनीकचे संचालक डॉ. सुजित सोमाणी यांची आयुष आंतर राष्ट्रीय मेडीकल असोशिएनच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. नितीन पाटील यांनी नियुक्ती केली आहे. सदर नियुक्ती ही 16 जून 2021 पर्यंत करण्यात आली आहे.
     आयुष आंतरराष्ट्रीय मेडीकल संस्था ही संपूर्ण देशात व विदेशात आयुर्वेद क्षेत्रात विविध प्रयोग करून सामाजिक बांधीलकी जोपासत आहे. कोरोना काळात व लॉकडाऊनमध्ये डॉ. सुजित सोमाणी यांनी आयुष मंत्रालयाच्या दिशानिर्देशानुसार आयुर्वेदीक औषध व विशेष काढा तयार करून जवळपास 20 हजार लोकांना मोफत औषधीचे वितरण केले होते. त्यामध्ये पोलीस प्रशासन, जिल्हा सामान्य रूग्णालय, जैन संघटनेच्या वतीने राबविण्यात आलेल्या डॉक्टर आपल्या दारी या उपक्रमांतर्गत एक हजार लोकांना औषधीचे वितरण केले. सोबतच विशेष परवानगी घेवून कोरोना पॉझीटीव्ह असलेल्या रूग्णांना वाशीमसह देशात अनेक ठिकाणी स्वत:ची आयुर्वेद औषधी उपलब्ध करून दिली. सोबतच वेळोवेळी कोरोना पॉझीटीव्ह रूग्णांसाठी काढ्याचे वितरण भोजनाची व्यवस्था करणार्‍या मार्फत उपलब्ध करून देत आहेत. सदर औषधीने अनेक कोरोना पॉझीटीव्ह रूग्णांना लाभ घेवून रूग्ण निगेटीव्ह आल्याची माहिती डॉक्टर सोमाणी यांना आपला रिपोर्ट पाठवून मुंबई, पुणे, हैद्राबाद, चेन्नई येथील रूग्णांनी दिली आहे. 
      आपण आयुर्वेद क्षेत्रात सामाजिक बांधीलकीतून कार्य करीत असून सदर कार्याची दखल राष्ट्रीय स्तरावरून घेण्यात आल्याने जवाबदारी वाढली असून निश्चितच आपण या क्षेत्रात भरीव कामगिरी करून आयुर्वेदाला आंतरराष्टीय स्तरावर विशेष गौरव प्राप्त करून देण्याचा संकल्प डॉ. सुजित सोमाणी यांनी दिला आहे. सदर कार्याकरीता आंतरराष्ट्रीय आयुष संघटनेचे सर्व पदाधिकार्‍यांचे प्रोत्साहन व सहकार्य मिळत असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. 

No comments

Powered by Blogger.