Header Ads

कारंजा व मानोरा तालुक्यातील जनतेला उपविभागीय अधिकारी राहुल जाधव यांचे आवाहन

कोरोना पासून स्वत:चे, परिजन तसेच समाजाचे रक्षणार्थ नियमांचे पालन करा; अन्यथा दंडात्मक कारवाई 

कारंजा व मानोरा तालुक्यातील जनतेला उपविभागीय अधिकारी राहुल जाधव यांचे आवाहन

     कारंजा (जनता परिषद) दि.०८ - कोविड-१९ (कोरोना) संसर्ग साथरोगाचा प्रादूर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने कारंजा व मानोरा तालुक्यातील सर्वच नागरिकांना नियमांचे पालन करा व प्रशासनाला सहकार्य करुन स्वत:, स्वत:चा परिवार व समाजाचे रक्षण करा अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे आवाहन कारंजा उपविभागाचे उपविभागीय अधिकारी राहुल जाधव यांनी केले आहे. 
घराबाहेर पडणार्‍या प्रत्येक व्यक्तीने मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे. नागरिकांनी दुचाकीवर डबलसिट किंवा ट्रिपलसिट प्रवास करु नये, ऑटो व कार चालकांनी दोन पेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करु नये आणि व्यावसायीकांनी त्यांचे प्रतिष्ठाणांपुढे सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे असे आवाहन जाधव यांनी केले आहे. 
कारंजा उपविभागामध्ये वरील प्रमाणे घालून दिलेल्या नियमांचे पालन नागरिक, वाहन चालक व व्यावसायीकांनी करावे. उपरोक्त नियमांचा भंग केल्याचे आढळून आल्यास संबंधितां विरुद्ध ५०० रुपये दंड आकारण्यात येईल किंवा भारतीय दंड संहिता, १८६० चे कलम १८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात येईल  असा ईशाराही त्यांनी दिलेला आहे. 
याबाबत दोन्ही तालुक्यातील तहसिलदार व पोलिस निरीक्षक यांना त्यांचे अधिनस्थ कार्यक्षेत्रात उपरोक्त नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची व त्याबाबत तसे नियमीतपणे अहवाल सादर करण्याचे  आदेश देण्यात आले आहेत. 

No comments

Powered by Blogger.