Header Ads

सर्व आस्थापनांनी ‘महास्वयंम’ संकेतस्थळावर ३१ जुलै पूर्वी माहिती अपडेट करण्याचे आवाहन


सर्व आस्थापनांनी ‘महास्वयंम’ संकेतस्थळावर
३१ जुलै पूर्वी माहिती अपडेट करण्याचे आवाहन

     वाशिम, दि. २७ (जिमाका) : जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय व खाजगी क्षेत्रातील आस्थापनांना दर तीन महिन्यांनी ऑनलाईन ई.आर.-१ सेवायोजन कार्यालये (रिक्तपदे अधिसूचित करण्याची सक्ती करणारा) अधिनियम १९५९ व नियमावली १९६० मधील कलम ५ (१) व कलम ५ (२) नुसार सादर करणे कायद्याने बंधनकारक आहे. त्याकरिता या आस्थापनांची माहिती (प्रोफाईल) अद्ययावत असणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व आस्थापनांना यापूर्वी प्राप्त झालेला युझर आयडी व पासवर्ड टाकून आपल्या आस्थापनांची प्रोफाईल  www.mahaswayam.gov.in अर्थात ‘महास्वयंम’ या नवीन वेबपोर्टलचा वापर करून ‘एम्प्लॉयमेंट’ या टॅबमध्ये एम्प्लॉयर लॉगीनमधून आपल्या आस्थापनेची माहिती (प्रोफाईल) ३१ जुलै २०२० पूर्वी अद्ययावत करावी.
       माहिती अद्ययावत करताना आपल्या आस्थापनाचा पत्ता पॅन अथवा टॅन क्रमांक, दूरध्वनी, भ्रमणध्वनी क्रमांक, मेल आयडी, वेबसाईट, अधिकारी अथवा कर्मचारी संख्या इत्यादी माहिती भरून अद्ययावत करावी. कुशल व अकुशल मनुष्यबळाची आवश्यकता असलेल्या आस्थापनांच्या कार्मिक किंवा संचालक यांनी महास्वयंम’ वेब पोर्टलचा वापर करावा.
       जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम योजना राबविली जात आहे. या योजनेंतर्गत खासगी आस्थापनांनी नियुक्त केलेल्या उमेदवारांना शैक्षणिक पात्रतेनुसार ३०० ते एक हजार रुपये विद्यावेतन सहा महिन्यांपर्यंत दिले जाते. या योजनेचा खासगी आस्थापनांनी लाभ घ्यावा, असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज यांनी कळविले आहे.  याबाबत काही अडचणी असल्यास कार्यालयाशी प्रत्यक्ष संपर्क साधावा किंवा ०७२५२-२३१४९४ या दूरध्वनी क्रमांकावर अथवा asstdiremp.washim@ese.maharashtra.gov.in  ई-मेल आयडीवर संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.