Header Ads

कारंजात कोरोनाने पुन्हा डोेके वर काढले : आज ४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह : रॅपीड अँटीजन टेस्टींगला आजपासून सुरुवात

कारंजात कोरोनाने पुन्हा डोेके वर काढले 

आज ४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह 

रॅपीड अँटीजन टेस्टींगला आजपासून सुरुवात 

कारंजा (जनता परिषद) दि.१० - कोरोनामुक्त झालेल्या कारंजात पुन्हा कोरोनाने डोके वर काढले असून आज एकुण ४ व्यक्तींचा कोरोना चाचणी अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे. 
यामध्ये आनंदनगर येथील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे संपर्कातील २ व्यक्तींचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह म्हणून आला आहे. तर दुसरीकडे सिंधीकॅम्प येथील एक ४५ वर्षीय पुरुषाचा ही अहयाल हा पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळाली आहे. 
अमरावती येथे काझी पूरा परिसरातील एका व्यक्तीचा अमरावती येथे रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. 
सर्व रुग्ण हे वेगवेगळ्या भागातील असून ह्यांना लागण कशी झाली व यांचे संपर्कात कोण-कोण आले होते त्याचा मागोवा प्रशासन घेत आहे. हे भाग सिल करण्यात येत असून पुढील कार्यवाही प्रशासन करीत असल्याची माहिती कारंजाचे तहसिलदार धिरज मांजरे यांनी दिली आहे. 

रॅपीड अँटीजन टेस्टींगला आजपासून सुरुवात 


कारंजातही रॅपीड अँटीजन टेस्ट ची सुरुवात आजपासून करण्यात येत असून ह्यामाध्यमातून तात्काळ रुपात कोरोना बाबतीचे निदान लागणार आहे. तसेच यामुळे टेस्टींगही हे मोठ्या प्रमाणावर शक्य होणार आहे. प्रारंभीक स्तरावर क्वारंटाईन सेंटर व जेथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत त्या भागात टेस्टींग केली जाणार आहे. 


     नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे असून मास्क लावणे, सोशियल डिस्टंसिंगचे पालन करणे, वारंवार हात धुणे तसेच गर्दी टाळणे व अनावश्यक मुक्त संचार न करता प्रशासनास सहकार्य करणे स्वरक्षणार्थ गरजेेचे आहे.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.