Header Ads

washim corona news - दि.२१ जुलै : वाशिम जिल्ह्यात आज २२ व्यक्ती कोरोनाने संक्रमीत तर १३ जणांना डिस्जार्च

washim corona news karanja lad malegaon risod mangrulpir manora

दि.२१ जुलै : वाशिम जिल्ह्यात आज २२ व्यक्ती कोरोनाने संक्रमीत तर १३ जणांना डिस्जार्च 

कारंजा (जनता परिषद) दि.२१ - जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आज वाशिम जिल्ह्यात सकाळी प्राप्त अहवालात १ तर संध्यकाळी प्राप्त माहितीनुसार २१ असे एकुण २२ व्यक्ती ह्या कोरोनाबाधीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. तर १३ व्यक्ती ह्या बरे झाल्याने त्यांना डिस्जार्च देण्यात आलेला आहे. 

सकाळी १ व्यक्ती पॉझिटिव्ह 

सकाळी १.३० वाजता जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री उशिरा ६४ व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले. यापैकी ६३ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आहेत, तर १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर व्यक्ती साईलीला नगर, वाशिम येथील असून यापूर्वीच्या बाधिताच्या संपर्कातील आहे.

संध्याकाळी २१ व्यक्ती पॉझिटिव्ह 

तर संध्यकाळी ६.३० वाजता जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी व सायंकाळी प्राप्त अहवालानुसार मांगवाडी (ता. रिसोड) येथील ११, मंगरूळपीर शहरातील माळीपुरा येथील १, कारंजा लाड शहरातील इंगोले प्लॉट येथील १ व नगरपरिषद परिसरातील १, वाल्हई (ता. कारंजा लाड) येथील १, मालेगाव शहरातील भावसार गल्ली परिसरातील २ व गांधीनगर परिसरातील १, इराळा (ता. मालेगाव) येथील १, शिरपूर जैन (ता. मालेगाव) येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. वाशिम शहरातील गुप्ता ले-आऊट, हिंगोली नाका परिसरातील १ व्यक्ती अकोला येथे कोरोना बाधित आढळून आला आहे.

आज १३ व्यक्तींना डिस्जार्च

दरम्यान, जिल्ह्यात उपचार घेणार्‍या १३ व्यक्तींना आज रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये वाशिम शहरातील गंगू प्लॉट येथील ४, कसाबपुरा येथील १, हिवरा रोहिला (ता. वाशिम) येथील ४, कारंजा लाड शहरातील सिंधी कॅम्प येथील १ व कामरगाव (ता.कारंजा लाड) येथील ३ व्यक्तींचा समावेश आहे.

No comments

Powered by Blogger.