Header Ads

उद्या १८ जुन ते २१ जुन कारंजातील सर्वच व्यापारी ठेवणार आपली प्रतिष्ठाणे बंद

 उद्या १८ जुन ते २१ जुन कारंजातील सर्वच व्यापारी ठेवणार आपली प्रतिष्ठाणे बंद  

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणेसाठी कारंजातील व्यापार्‍यांचा पुढाकार

 विविध व्यापारी असोसिएशनांचा स्वयंस्फुर्तीने निर्णय 

कारंजा (जनता परिषद) दि.१७ - गत काही दिवसात कारंजा शहरातील विविध भागांमध्ये कोव्हीड १९ चे रुग्ण आढळून आले आहेत. आजमितीला शहरात राहणारे कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींची संख्या १८ वर पोहोचली आहे.  बाजारपेठ खुली असल्या कारणाने नागरिकांचा मुक्तसंचार होतो आहे. यामुळे शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, शहरात होत असलेली वर्दळ रोखणेसाठी शहरातील सर्वच दुकाने बंद करणे हे अगत्याचे झाले असल्याचे कारंजा व्यापारी असोसिएशन चे म्हणणे आहे यासाठी शहरातील संपूर्ण बाजारपेठ, ज्वेलरी व्यापारी, कपडा व्यापारी, जनरल व कटलरी व्यापारींसह सर्व दुकाने ४ दिवसांसाठी बंद करण्याचे निर्णय स्वयंस्फुर्तीने कारंजातील सर्वच व्यापारी असोसिएशन ने मिळून घेतला आहे. 
याबाबत असोसिएशनचे वतीने प्रशासनाने चार दिवसांचा जनता कर्फ्यु लावावा असे आदेश देण्याचे विनंती करणारे अर्ज तहसिलदार धिरज मांजरे यांना आज देण्यात आले.
कारंजा व्यापारी असोसिएशनने व्यापार्‍यांना केलेले आवाहनानुसार, कारंजा शहरात उद्या दिनांक १८ जुन २०२० ते २१ जुन २०२० असे चार दिवस लहान मोठी अशी सर्वच दुकाने ही बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच जनतेलाही हे जनता कर्फ्यु पाळण्याचे व यशस्वी आवाहनही असोसिएशनने केले आहे. 
कारंजा शहरातील दुकाने बंद करण्याचा निर्णय हा व्यापार्‍यांचा स्वयंस्फुर्त असल्याचे तहसिलदार धिरज मांजरे यांनी सांगितले आहे.

No comments

Powered by Blogger.