Header Ads

दि.१६ : कारंजात संध्याकाळी ३ पॉझिटिव्ह; आज एकुण ९ पॉझिटिव्ह

दि.१६ : कारंजात संध्याकाळी ३ पॉझिटिव्ह;  आज एकुण ९ पॉझिटिव्ह

प्रशासनाने घेतली बैठक; कॉरंटॉईन सेंटरची केली पाहणी

प्रशासनाचे निर्देशांचे पालन करावे - तहसिलदार मांजरे

कारंजा दि.१६ - शहरात कोरोनाचे रुग्णांची संख्या दिवसच नव्हे तर दिवसाचे सत्रागणीक वाढत असून आज संध्याकाळचे सत्रात ३ व सकाळी ६ असे एकुण ९ कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे शहरातील कोरोना बाधीतांची संख्या ही १८ तर तालुक्यातील संख्या ही २३ झाली असून यातील २२ रुग्ण ऍक्टीव्ह आहेत, अशी माहिती कारंजाचे तहसिलदार श्री धिरज मांजरे यांनी जनता परिषदशी बोलतांना दिली. शहरातील भारतीपुरा, माळीपुरा, गांधी चौक व दसरा मैदान परिसर हे कॉन्टेंन्मेंट झोन म्हणून घोषीत करण्यात आलेले आहे. 

आज पॉझिटिव्ह ३ ंपैकी २ हे दसरा मैदानातील रुग्णाचे संपर्कातील तर १ दारव्हा येथील पॉझिटिव्ह व्यक्तीचे संपर्कातील

संध्याकाळी पॉझिटिव्ह म्हणून आलेले ३ जणांमध्ये २ हे शिवाय नम: मठचे पॉझिटिव्ह व्यक्तीचे संपर्कातील आहेत. तर १ व्यक्ती हे दारव्हा येथे गेले असता, ज्या व्यक्तींचे संपर्कात आले ते पॉझिटिव्ह आढळल्याचे माहिती पडल्यावर स्वत:हून कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. 

सकाळी आले २४ पैकी ६ पॉझिटिव्ह तर १८ निगेटिव्ह

आज सकाळी प्राप्त २४ कोरोना विषयक चाचणीचे बाबतीतील अहवालातील ६ पॉझिटिव्ह आले होते तर यांतील १८ जणांचे अहवाल हे निगेटिव्ह आलेत. शिवाय नम: मठाजवळील पॉझिटिव्ह व्यक्तीचे संपर्कातील ३ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेेत. 

१० जणांचे थ्रोट स्वॅब आज तपासणीसाठी पाठविणार 

दरम्यान, आज सकाळी पॉझिटिव्ह म्हणून आलेले व्यक्तींचे संपर्कातील १० जणांचे घशातील स्त्रावाचे नमूने हे आज रात्री तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. 

प्रशासनाने घेतली बैठक; कॉरंटॉईन सेंटरची केली पाहणी

शहरात वाढत असलेले रुग्णांची संख्या पाहता, आज सकाळी आमदार राजेंद्र पाटणी यांची तर त्यानंतर प्रशासनाचे वतीनेही अधिकार्‍यांची स्थानिक विश्रामगृहाला मिटींग झाली. यामध्ये अतिरिक्त जिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधिक्षक, जिल्हा वैद्यकीय अधिकारी तसेच उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, तहसिलदार, तिन्ही पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक, मेडिकल सुपरिटेंडेंट, वैद्यकीय अधिकारी हे उपस्थित होते. यामध्ये शहरातील वाढते कोरोना रुग्णांची संख्याबाबत चर्चा करण्यात आली तसेच उपाययोजना बाबतही विचार विमर्श करण्यात आले. यानंतर उपलब्ध सोयी सुविधा तसेच इतर बाबींची तपासणी करणेसाठी अधिकार्‍यांनी उपजिल्हा रुग्णालय व मदरसा ची पाहणी केली. 

प्रशासनाचे निर्देशांचे पालन करावे - तहसिलदार मांजरे

नागरिकांनी शासनाने दिलेले निर्देशांचे पालन करावे, तसेच आनवश्यक फिरू नये, मास्क वापरावे, सोशियल डिस्टेंसिंग ठेवावी, गर्दी करू नये असे आवाहनही तहसिलदार धिरज मांजरे यांनी कारंजातील जनतेला केले आहे. 



No comments

Powered by Blogger.