Header Ads

चेतन सेवाकुंंर ग्रुपच्या वतीने कोरोना कर्मवीर योध्दांचा सत्कार

चेतन सेवाकुंंर ग्रुपच्या वतीने कोरोना कर्मवीर योध्दांचा सत्कार


     वाशीम (का.प्र.) दि ०२ - कोरोना व लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यात अग्रसेर असलेल्या भारतीय जैन संघटनेच्यावतीने संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा यांच्या मार्गदर्शनात वाशीम जिल्हयात डॉॅॅक्टर आपल्या दारी हा उपक्रम जिल्हा उपक्रम संयोजक शिखरचंद बागरेचा व जिल्हा सहसंयोजक तसेच भारतीय जैन संघटनेचे जिल्हाध्यक्ष निलेश सोमाणी यांच्या मार्गदर्शनात सतत 60 दिवसांपर्यंत राबविण्यात येवून या उपक्रमअंतर्गत जवळपास 15 हजार लोकांची आरोग्याची मोफत तपासणी व मोफत औषधीचे वितरण करण्यात आले. सदर उपक्रमाची दखल घेत केकतउमरा येथील सेवाकुंर आर्केस्ट्रा गु्रपच्यावतीने 2 जुन रोजी डॉक्टर आपल्या दारी उपक्रमात सेवा देणार्‍या सर्व कोरानावीर योध्दांचा अंध बांधवांच्याहस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देवून भावपूर्ण सत्कार करण्यात आला. सदर उपक्रमातून अंध बांधवांनी समाजाला दृष्टी व दिशा देण्याचे कार्य केले आहे.
        चेतन सेवाकुंर ग्रुप केकतउमराच्यावतीने उपक्रम संयोजक शिखरचंद बागरेचा, वैद्यकिय अधिकारी डॉ. सुजाता भगत, आरोग्य सेवक डॉ. नितीन व्यवहारे, डॉ. राधेश्याम वैद्य, बिजेएस जिल्हाध्यक्ष निलेश सोमाणी, सामाजिक कार्यकर्ते रविंद्र पेंढारकर, गजानन शेळके, सुनिल दिग्रसकर, संजीव भांदुर्गे, अक्षय घोडे, चालक पांडूरंग सरनाईक, संजय दिग्रसकर, प्रमोद भवाळकर, दिपक उचितकर, गजानन अग्रवाल यांचा भावपूर्ण सत्कार चेतन सेवांकुर गु्रपचे मार्गदर्शक पांडूरंग उचितकर, प्रमुख चेतन उचितकर व ग्रुपच्या सर्व सदस्यांच्यावतीने करण्यात आला. सदर सत्कार सोहळयात वातावरण भावनिक झाले होते. यावेळी जिल्हाध्यक्ष निलेश सोमाणी व शिखरचंद बागरेचा यांनी आपले मनोगत व्यक्त केले. खर्‍या अर्थाने या कठिण काळात वैद्यकिय अधिकारी डॉक्टर भगत, व्यवहारे, वैद्य यांनी आपले कर्तव्य बजावून मोफत या अभियानात आपली सेवा प्रदान केली. चेतन सेवाकुंर ग्रुपने वाहन उपलब्ध करून दिले. त्यामुळेच आम्ही हा उपक्रम यशस्वीपणे पूर्ण केला आहे. संपूर्ण राज्यात वाशीम जिल्हा या उपक्रमात सेवा देण्यामध्ये अग्रक्रमावर असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. सदर उपक्रमाला अनेक डॉक्टर मंडळी, सामाजिक संघटना यांनी औषधरूपी व अन्य सेवा दिल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. प्रास्ताविकातून पांडूरंग उचितकर यांनी एकीकडे कोरोनाच्या कठिण काळात अनेकांनी आपल्या कर्तव्य पार न पळता भितीपोटी सेवा बंद केली होती. अनेक दवाखाने बंद होते मात्र आपल्या जीवाची पर्वा न करता भारतीय जैन संघटनेच्या या मावळयांनी खर्‍या अर्थाने ग्रामीण भागात व शहरातील प्रत्येक भागात जावून डॉक्टर आपल्या दारी उपक्रमांतर्गत सेवा प्रदान करून सेवेचा आदर्श नमुना समाजासमोर प्रस्तापित केला आहे. सामाजिक कार्यकर्ते बागरेचा व सोमाणी हे सदैव सामाजिक उपक्रमामध्ये सहभागी होत असून तन-मन-धनाने ही जोडी स्वत:ला झोकून देवून कार्य करीत असल्याने त्यांच्या कार्याला भगवंत यश देत असल्याचेही त्यांनी आवर्जून नमुद केले. कार्यक्रमाचे बहारदार संचालन गजानन धामणे यांनी केले. कार्यक्रमाला गंगाताई उचितकर, पांडूरंग उचितकर, त्यांच्या मातोश्री व डॉ. माधव हिवाळे उपस्थित होते. 

No comments

Powered by Blogger.