Header Ads

दि.१६ जुन : वाशिम जिल्ह्यात आज १० कोरोना पॉझिटिव्ह


अफवा पसरवू नका  *    मास्क वापरा   *  प्रशासनाला सहकार्य करा 

दि.१६ जुन : वाशिम जिल्ह्यात आज १० कोरोना पॉझिटिव्ह

एकुण रुग्ण संख्या झाली ६२ तर ऍक्टीव्ह ५२

तालुकानिहाय : कारंजा ६, मालेगांव २, वाशिम १ तर मंगरुळपीर १


वाशिम (जनता परिषद) दि.१६ -  वाशिम जिल्ह्यात आज रोजी प्राप्त अहवालांनुसार एकुण १० व्यक्तींचे कोरोना विषयक चाचणी अहवाल हे पॉझिटिव्ह आले असून एकुण पॉझिटिव्ह संख्या ही ६२ झाली असून ५२ हे ऍक्टीव रुग्ण आहेत. अशी माहिती वाशिमचे जिल्हा शल्य चिकित्सक श्री.अंबादासजी सोनटक्के यांनी जनता परिषदशी बोलतांना दिली. 
     यामध्ये कारंजा ६, वाशिम १, मालेगांव २ तर मंगरुळपीर १ असे तालुकानिहाय रुग्ण आढळून आले आहेत. 

कारंजात शहरात एकुण १५; तालुक्यात एकुण २०; तर ऍक्टीव्ह १९ रुग्ण

आजचे माहितीनुसार, कारंजा शहरातील भारतीपुरा येथील ६ रुग्ण जे गांधी चौक येथील पॉझिटिव्ह रुग्णाचे संपर्कातील होते; त्यांचे अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये ३८ व ४८ वर्षीय महिला, ३३ व ५८ वर्षीय पुरुष तसेच दोन ६ वर्षीय मुलींचा समावेश आहे. 
यामुळे कारंजा शहरातील एकुण कोरोना रुग्णांची संख्या ही वाशिम जिल्ह्यात झालेले चाचणीत पॉझिटिव्ह आलेले पुर्वीचे ७, आज रोजी चे ६ व अमरावती येथे झालेेले चाचणीत पॉझिटिव्ह आलेले २ अशी एकुण १५ झाली असुन तालुक्यातील रुग्ण संख्या ही २० झाली आहे. यांतील दादगांव येथील महिलेला डिस्जार्च मिळाल्यामुळे ऍक्टीव रुग्ण संख्या ही १९ आहे. 
वाशिम तालुक्यातील ग्राम हिवरा रोहिला येथील मुंबई येथून आलेला २९ युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.  
     तर मालेगांव तालुक्यातील राजुरा येथील २ तर मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथील एका व्यक्तीचा कोरोना बाबतीतील चाचणी अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे.

No comments

Powered by Blogger.