Header Ads

दि.१२ आज वाशिम जिल्हयात पुन्हा १ कोरोना पॉझिटिव्ह


॥ काळजी घ्या : सुरक्षीत रहा : मास्क वापरा : प्रशासनाला सहकार्य करा ॥
दि.१२ आज वाशिम जिल्हयात पुन्हा १ कोरोना पॉझिटिव्ह  

जिल्ह्याची एकुण रुग्ण संख्या पोहोचली २६ वर  

कारंजा (जनता परिषद) दि.१२ - आज जिल्हा प्रशासनाद्वारे सकाळी १०.०० वाजता देण्यात आलेल्या माहितीनुसार वाशिम जिल्ह्यात पुन्हा एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला आहे. सदरहू व्यक्ती काही व्यक्तींसह मुंबई येथील दादर येथून मालेगांवला आली होती. या ४६ वर्षीय व्यक्तीचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला असून त्याचे सह आलेल्या इतर दोघांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आले आहेत. जिल्हा प्रशासनाने ह्या व्यक्तींचे संपर्कातील व्यक्तींची माहिती घेणे सुरु केले आहे. 
यामुळे आता जिल्ह्यातील ऍक्टीव रुग्णांची संख्या ही १९ झाली आहे. 
जिल्ह्यातील एकुण रुग्ण संख्या ही २६ असून यांतील २ मृत्यू झाले असून ६ बरे झाले आहेत तर ऍक्टीव्ह रुग्ण संख्या ही १८ आहे. तर बाहेर जिल्ह्यात तपासणी झालेले व पॉझिटिव्ह असलेले रुग्णांची संख्या २ असून यांतील एकाला डिस्जार्च मिळाला असून १ व्यक्ती ही ऍक्टीव असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाचे वतीने देण्यात आलेली आहे. 
॥ मास्कचा वापर करा : अंतर राखा : सुरक्षीत रहा ॥
॥ अफवा पसरवू नका, अफवा पसरविणे कायद्याने गुन्हा आहे ॥

No comments

Powered by Blogger.