Header Ads

वाशिम जिल्ह्याचे लगतचे जिल्ह्यांमध्ये होतोय कोरोनाचा उद्रेक

वाशिम जिल्ह्याचे लगतचे जिल्ह्यांमध्ये होतोय कोरोनाचा उद्रेक 

२४ तासात : हिंगोली-३६, अकोला-११, अमरावती-५ पॉझिटिव्ह 

काळजी घ्या.....  सुरक्षीत रहा.....  अनावश्यक फिरु नका.....

प्रशासनास सहकार्य करा !
कारंजा (आशिषकुमार शर्मा) दि.०५ - वाशिम जिल्हा लगत असलेल्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा उद्रेक होत असून दिवसेंदिवस वाढणारी कोरोनाग्रस्तांची संख्‌या ही आता दिवसातून तासागणीक वाढते की काय असा प्रश्‍न निर्माण होत आहे.  मागील २४ तासाच हिंगोलीत ३६, अकोला ११ व अमरावती मध्ये ५ पोझिटिव्ह आढळून आलेले आहेत. इतकेच काय तर कारंजाचे सिमेवरच असलेले पिंजर येथील १ इसमही कोरोना पॉजिटिव्ह आढळून आलेला आहे. 
तरी अजूनही वेळ गेेलेली नसून नागरिकांनी बाहेर काही काम नसेल तर घरीच राहा... सुरक्षीत राहा.... अनावश्यक फिरु नका..... ह्यावर पुरेपुर अंमल करणे गरजेचे आहे. 
वाशिम जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा पोलिस अधिक्षक वसंत परदेशी, जिल्हा शल्य चिकित्सवक डॉ.अंबादास सोनटक्के यांचे नेतृत्वात व मार्गदर्शनात जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या नेतृत्वात संपूर्ण महसुल विभाग, उपविभागीय पोलिस अधिकारी, सर्वच पोलिस स्टेशनचे ठाणेदार यांचे नेतृत्वात संपूर्ण पोलिस यंत्रणा, जिल्हा सामान्य रुग्णालय ते पिएससी पर्यंतची सर्व आरोग्य विभागाचे अधिकारी ते सेवक जिल्ह्यातील सर्वच नगर परिषद,  नगर पंचायत व ग्राम पंचायत चे अधिकारी व कर्मचारीगण आपले प्राण पणाला लावून केवळ व केवळ जनतेच्या जिवित्वाचे रक्षणार्थ न दिसणार्‍या कोरोना ह्या विषाणूला लढत देत आहेत. 
नागरिक म्हणून शासन व प्रशासनाला सहकार्य करण्याची आजमितीला सर्वाधिक आवश्यकता असून हिच यंत्रणा नसली तर किती भयावह होऊ शकते याचा तर विचारही करणे दुरापस्त आहे. तरी नागरिकांनी सजग राहुन स्वत:ची, स्वत:च्या परिवाराची, समाजाची व संपूर्ण देशाची एक मनुष्य म्हणून मानवतेच्या रक्षणार्थ काळजी घेणे खुप गरजेचे आहे. 
कालपासून ग्रिन झोन असल्यामुळे काही बाबींमध्ये व काही व्यवसाय सोडून इतर सर्व दुकाने सुरु करण्यास परवानगी मिळाली आहे, त्याचा मान ठेवून योग्य प्रकारे वर्तन ठेवणे गरजेचे आहे. 
तरी आपण आपली स्वत:ची काळजी घेऊन अनावश्यकपणे न फिरता, सुरक्षीत रहा व आपले परिवाराची, समाजाची व पर्यायाने देशाची व मानवतेची सेवा करा, हिच साप्ताहिक जनता परिषद परिवाराचे वतीने नम्र विनंती. 

No comments

Powered by Blogger.