Header Ads

जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांच्या कार्याचे शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे यांनी केला गौरव

जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांच्या कार्याचे शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे यांनी केला गौरव 

शिक्षादान करणारे शिक्षक देत आहेत आज विविध सेवा 

रुग्ण सर्व्हेक्षण, स्वस्त धान्य दुकान निरीक्षण, जिल्हा हद्दीचे अनावश्यक आगंतूकापासून रक्षण



वाशिम (जनता परिषद) दि. 01 - वाशिम जिल्हा ग्रिन झोन मध्ये राहणेसाठी जिल्ह्याचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी पार पाडलेल्या यथायोग्य कर्तव्याचे व क्रमबद्ध नियोजनाचे आ.श्रीकांत देशपांडे यांनी कौतूक केले. अमरावती विभागाचे शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे यांनी आज वाशिम येथे भेट दिली त्यावेळी जिल्हाधिकारी यांचेशी  भेट घेतल्यावर ते बोलत होते. जिल्ह्याचे शेजारील सर्वच जिल्हे हे आजमितीला कोरोनाने अतित्रस्त असून अशावेळी मध्यवर्ती ठरणारा वाशिम जिल्हा कोरोनामुक्त असणेसाठी जिल्हाधिकारी यांचे करावे तितके कौतूक कमी आहे, या शब्दात आ.देशपांडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात. 
राज्यात आज शिक्षकवृंद हे कोरोनाच्या या युद्धात आपली भूमीका बजावित असून शासन व प्रशासनाचे खांद्याला खांदा लावून कार्य करीतअसल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षक वृंद हे बिएलओ म्हणून घराघरातील रुग्णांचे सर्व्हेक्षण करीत आहेत, स्वस्त धान्य दुकानातून धान्याचे वाटप योग्य पद्धतीने होते आहे की नाही याचे निरीक्षण करण्याची जबाबदारीही पार पाडीत आहते. तसेच जिल्हा असो वा तालुका स्तरावर सिल केलेल्या हद्दीचे अनावश्यक आगंतूकापासून रक्षण करण्याचे काम ही ते पार पाडीत असल्याचे श्रीकांत देशपांडे यांनी यावेळी सांगितले. शिक्षकांचे कार्याचे दृष्टीने त्यांना महसुल प्रशासनाने ओळखपत्रे, आरोग्य विषयक सुविधा तसेच विमा सुरक्षा देणे याबाबतही त्यांनी चर्चा केली. 
जिल्हाधिकारी यांच्या भेटीनंतर त्यांनी जिल्हा परिषदचे मुख्‌य कार्यकारी अधिकारी दिपक मिणा, तहसीलदार विजय साळवे, नायब तहसीलदार दिपक दंडे यांच्याशी चर्चा केली. अमरावती विभागाचे शिक्षक आमदार म्हणून श्रीकांत देशपांडे हे विभागातील सर्वच जिल्हाधिकारी व तहसीलदार यांचेशी दुरध्वनीद्वारे संपर्क साधून त्या-त्या भागातील आढावा घेत असून यथायोग्य निर्देशही देत आहेत. 
यावेळी आ.देशपांडे यांचेसोबत शिक्षक आघाडीचे मार्गदर्शक प्रा.दिलीप जोशी, शिक्षक आघाडी जिल्हाध्यक्ष प्रा.रमेश आरु, निवासी उपाध्यक्ष प्रा.श्रीकांत जोशी, समाजसेवक लॉ.वसंतराव धाडवे व त्यांचे स्विय सहाय्यक रविंद्र सोळंके हे उपस्थित होते. 

No comments

Powered by Blogger.