ग्राम पंचायतने जाणीले आपले कर्तव्य : इतरांनीही घ्यावा बोध
ग्राम पंचायतने जाणीले आपले कर्तव्य : इतरांनीही घ्यावा बोध
बाहेर जिल्ह्यातून येणार्या नागरिकांसाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आखतवाडा सज्ज
कारंजा (का.प्र.) दि.०४ - आजमितीला संपूर्ण जग हे कोरोना च्या भयानक त्रासदीने त्रस्त आहे. संपूर्ण जग, देश, राज्य, जिल्हा, गांवच काय तर वैयक्तीक पातळीवर प्रत्येक व्यक्ती ह्या लढ्यात सहभागी झालेला आहे. जो तो त्याचे आवाक्यात असलेले शक्य ते सर्व ह्या रोगाचे विरोधाची लढाई जिंकणेसाठीचे प्रयत्न करीत असतांना दिसून येतो आहे.

कोरोना विरुद्धची लढाई जिंकण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आखतवाडा येथील शाळेमध्ये बाहेरून गावात येणार्या नागरिकांची राहण्याची सुविधा शाळेमध्ये करण्यात आली आहे, त्यासाठी शाळेची संपूर्ण स्वच्छता केली असून येणार्या नागरिकांचे सुविधेसाठी स्वच्छालय साफसफाई तसेच वर्गखोल्यांची व परिसराची स्वच्छता करण्यात आली आहे. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक ढोरे सर व इतर शिक्षक वृंद, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दीपक काकड, व इतर सदस्य आणि शाळा पोषण आहार मदतनीस सौ विशाखा ताई सोनोने, व सौ. बेबीताई रावेकर आणि उपसरपंच देवेंद्र ज्ञानेश्वर फुके हे उपस्थित होते.
बाहेरून येणार्या नागरिकांनी मनात कोणतीही हिन भावना न ठेवता गावामध्ये प्रवेश केल्यानंतर ग्रामपंचायतला कळविले नंतर शाळेमध्ये प्रवेश करावा. तुम्ही आम्हाला सहकार्य करा, आम्ही तुम्हाला पूर्णपणे मदत करू असे विनंती वजा आवाहन सरपंच, सौ. योगिताताई गावंडे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील किशोर जाधव, सचिव उपाध्ये यांनी केली आहे,
Post a Comment