Header Ads

दिलासा: दुसरेही डॉक्टर व टिम निघाले सुखरुप

दिलासा: दुसरेही डॉक्टर व टिम निघाले सुखरुप 

एकुण सातही रिपोर्ट निगेटिव्ह 

 त्या रुग्णांचे संपर्कातील अद्यापपर्यंतचे वाशिम व वर्धा येथील सर्वच रिपोर्ट निगेटिव्ह 



कारंजा (जनता परिषद) दि.१३ - वर्धा येथे कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णावर उपचार करणारे कारंजा येथील डॉक्टर व त्यांच्या टिमचे टेस्ट हे निगेटिव्ह आल्याने कारंजेकरांना दिलासा मिळाला आहे. पहिले डॉकटर नंतर दुसरेही डॉक्टर व त्यांचे टिम ही सुखरुप निघाल्याने कारंजेकरांनी सुटकेचा नि:श्‍वास टाकला आहे. सर्वच निकाल निगेटिव्ह आल्याने जिल्ह्यातील समस्त नागरिक, आरोग्य विभाग व संपूर्ण प्रशसानाला ही दिलासा मिळाला आहे. 
सोमवार दि. ११ मे रोजी वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयातून पाठविण्यात आलेल्या ७ जणांचेही रिपोर्ट हे निगेटिव्ह आले आहेत. यांत कारंजा येथील डॉक्टर व त्यांचे चमु सह रिसोड तालुक्यातील ग्राम पाचंबा व पोहा येथील आढळलेल्या सारीच्या २ रुग्णांचाही समावेश आहे. 
११ मे रोजी मंगरुळपीर तालुक्यातील ग्राम कवठळ येथील रहिवासी असलेला वर्धा येथील रुग्णालयात भरती असलेला ६४ वर्षीय रुग्ण हा कोरोना बाधीत असल्याचे आढळून आल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. सदरहू इसम हा दिनांक ३० एप्रील ते ४ मे असे ५ दिवस कारंजा येथील एका खाजगी दवाखान्यात भरती होता. त्यानंतर तो अकोला येथील रुग्णालयात गेला व त्यानंतर दोन दिवस घरी म्हणजेच कवठळ येथे राहिल्यावर शनीवार दिनांक १० मे रोजी वर्धा येथे भरती झाला होता. 
या दरम्यान संबंधीत रुग्णाचा त्यांचे परिजण सह गावातील नागरिक, न्हावी, गाडी चालक सह तपासणी करणारे डॉक्टर व चमु आदी सरळ संपर्कात आले होेते.  जवळपास ह्या सर्वांचीच तपासणी करण्यात आलेली असून वर्धा जिल्हा माहिती कार्यालयाने दिलेल्या माहिती नुसार व प्राप्त माहिती नुसार सदरहू व्यक्तीचे संपर्कात आलेले वर्धा येथील डॉक्टर, त्यांची चमु तसेच रुग्णाचा मुलगा आदींचेही रिपोर्ट हे निगेटिव्ह आले आहेत. तसेच पक्षघात, हृदयविकार सह आता कोरोना बाधीत असलेल्या ह्या रुग्णाची प्रकृती स्थिर असून त्याला कोरोनाचे कोणतेच लक्षण नसल्याचेही सांगितले आहे. यामुळे सदरहू रुग्णाची पुन्हा १४ दिवसानंतर एकदा कोरोना चाचणी घेण्यात येईल. 

कालचे ९ जणांचे रिपोर्ट अप्राप्त 

मंगळवार दि.१२ मे रोजी अकोला येथील वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेल्या ९ जणांचे तपासणी अहवाल अद्याप अप्राप्त असून ते आज संध्याकाळी किंवा उद्या प्राप्त होणार आहे. यांत कवठळ येथील रुग्णाचे संपर्कातील ७ जणांचे रिपोर्ट यावयाचे आहेत. 

No comments

Powered by Blogger.