Header Ads

वाशिम जिल्ह्याचे आज प्राप्त ५ ही रिपोर्ट पॉझिटिव्ह


वाशिम जिल्ह्याचे आज प्राप्त ५ ही रिपोर्ट पॉझिटिव्ह 

मात्र घाबरून जाण्याचे कारण नाही : काळजी घेणे गरजेचे 

चाचणी करवून व सरळ रुग्णालयात येऊन कुटुंबाने जोपासली होती कर्तव्यभावना  

कोरोनाग्रस्तांची एकुण संख्या आता ८ : आज रोजी १२ रिपोर्ट येणे बाकी



वाशिम (जनता परिेषद) दि.१९ - आज सकाळी जिल्हा माहिती कार्यालय द्वारा देण्यात आलेल्या माहिती नुसार अकोला येथील प्रयोगशाळेतून आलेले ५ ही रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. रवीवार दि. १७ रोजी वाशिम येथून कोरोना संक्रमीत असलेल्या महिलेचे कुटुंबातील ६ जणांचे थ्रोट स्वॅब हे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील हे ५ रिपोर्ट असून एका व्यक्तीचा रिपोर्ट येणे अद्याप बाकी आहे. 
शनीवार दि.१६ मे रोजी मुंबई येथून मालेगांव साठी एक सात सदस्यीय कुटुंब निघाले, तत्पुर्वी कुटुंबातील ज्या महिलेला कोरोनाची लक्षणे दिसून येत होती तिची तेथे चाचणी करण्यात आली.  मार्गातच या महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे मेहकर येथे पोहोचले असतांना या परिवाराला माहिती होताच, ते तेथून सरळ वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाले. त्या सर्वांना आयसोलेशन वार्डात ठेवले असून ह्यांचा जिल्ह्यात कोठेच संपर्क झालेला नाही. आज प्राप्त अहवालात या परिवारातील ५ जणांचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आले आहेत. मुंबई येथे चाचणी करुन घेणे, मार्गातच रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याचे कळताच सरळ रुग्णालयात येणे हे खरेच त्या परिवाराची कर्तव्य भावना दर्शविते. यासाठी निश्‍चितच ते सर्व अभिनंदनास पात्र आहेत. 
आज जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सोनटक्के यांनी दिलेले माहिती नुसार १२ जणांचे रिपोर्ट येणे बाकी असून आत्ता एकुण १७ व्यक्तींना आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आलेले आहे. 
एकुण १५६ रुग्णांची नोंद असून यांतील ४१ हे गृह विलगीकरणात, ३ संस्थात्मक विलगीकरणात, १७ अलगीकरणात आहेत. एकुण ११९ जणांचे घशांचे स्त्राव चाचणीसाठी घेण्यात आलेले असून यांतील ९९ हे निगेटिव्ह तर ८ हे पॉझिटिव्ह आहेत. यांतील दोघे बरे झाले असून एकाचा मृत्यू झालेला आहे. तर उर्वरित ५ जणांवर त्यांचेसह असलेले सहाव्या महिला रुग्णावर उपचार सुरु आहेत. 

------------------------------------------------------------------------------------------------------------

Washim district: 5 reports received today is positive

Don't get Panic : Take Care
The family had cultivated a sense of duty by undergoing tests and coming straight to the hospital
Total Positive now 8 : 12 Reports Awaited Today

     Washim (Janata Parishad) 19th - As per the information given by the District Information Office this morning, 5 reports from the laboratory in Akola came positive, On Sunday Throat swabs of six members of the family of a woman infected with corona were sent from Washim on the 17th for investigation. Of these, 5 are reported today and one person's report is yet to come.
      A seven-member family left Mumbai for Malegaon on Saturday, May 16. Earlier, a woman from the family who was showing symptoms of the corona was tested there. On the way, when Mehkar reached here, the family came to know that the report of the woman was positive. From there, they rushed straight to Washim District General Hospital. All of them were kept in isolation wards and have no contact anywhere in the district. In the report received today, the reports of 5 members of this family have come positive. Getting tested in Mumbai, coming straight to the hospital as soon as the report came positive on the way, really shows the sense of duty of the family. Of course, they all deserve congratulations. The whole District is praying that may God cure all of them very soon. 
     As per the information given by District Surgeon Dr. Sontakke today, reports of 12 persons are yet to be received and now a total of 17 persons have been kept in isolation.
     A total of 156 patients have been registered out of which 41 are in home segregation, 3 in institutional segregation, 17 in isolation. A total of 119 people were tested for sore throat, out of which 99 were negative and 8 were positive. Two of them have recovered and one has died. The remaining five are undergoing treatment along with the sixth female patient with them.

No comments

Powered by Blogger.