Header Ads

संचारबंदी उल्लंघन प्रकरणी वाशिम जिल्हा पोलिसाची धडक कारवाई

संचारबंदी उल्लंघन प्रकरणी वाशिम जिल्हा पोलिसाची धडक कारवाई 

१६ वाहने जप्त व ३६ जणांवर गुन्हे दाखल 

वाशिम (जनता परिषद) दि.४ - कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन केलेले आहे. पोलिस प्रशासनाने वेळोवेळी विनाकारण कोणीही रस्त्यावर फिरू नये अशा वारंवार सुचना देऊनही काही हेकेखोरांनी पालन न केले नाही. अशांचे विरोधात जिल्हा पोलिस अधिक्षक श्री वसंत परदेशी यांचे आदेशान्वये प्रत्येक पोलीस ठाणे स्तरावर पथक नेमुन कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले होते. 
त्या अनुषंगाने संचारबंदीचे उल्लंघन करणारे तसेच विनाकारण फिरणारे लोकांवर धडक कारवाई करीत दि. ०३/०४/२०२० ते ०४/०४/२०२० चे १८.०० वाजे पर्यंत वाशिम जिल्ह्यातील एकुण ३६ लोकांविरुद्ध गुन्हे दाखल करुन एकुण १६ मोटार सायकल स्वारांवर कार्यवाही करीत मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत. 
तरी जिल्हा पोलिस अधिक्षक श्री वसंत परदेशी यांनी वाशिम जिल्ह्यातील सर्व जनतेला प्रशासनाचे वतीने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन केले आहे. जो कोणी नियमांचे पालन करणार नाही त्याचेवर कठोर कार्यवाही करण्यात येणार आहे, तरी दक्षता घ्यावी असे सुचीत करण्यात आले आहे. 
नागरिकांनी लॉकडाऊन काळात घरात राहून आपले व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी. अडचणीच्या काळात पोलिस प्रशासन व इतर प्रशासकीय सेवा आपल्या सहकार्यासाठी सदैव तत्पर आहेत असेही त्यांनी सांगितले आहे. 

No comments

Powered by Blogger.