Header Ads

निराधार जेष्ठ नागरिक व दिव्यांग (अपंग) व्यक्तीचे मदतीसाठी


निराधार जेष्ठ नागरिक व दिव्यांग (अपंग) व्यक्तीचे मदतीसाठी 

वाशिम जिल्हा पोलिस दलातर्फे विशेष पथकाचे गठन

वाशिम (जनता परिषद) दि.२ - कोरोना ह्या राक्षसी रोगामुळे संपूर्ण देशच आजमितीला लॉकडाऊन आहे. मात्र तरीही निराधार, जेष्ठ नागरिक व दिव्यांग (अपंग) व्यक्तींचे मदतीसाठी वाशिम जिल्याचे पोलिस अधिक्षक श्री वसंत परदेशी यांचे नेतृत्वात वाशिम जिल्हा पोलिस विभाग सरसावले आहे. 
निराधार, जेष्ठ नागरिक व दिव्यांग (अपंग) व्यक्ती स्वत: घराबाहेर पडून अत्यावश्यक चिजवस्तू खरेदी करुन आणू शकत नाहीत. वेळेप्रसंगी अशा व्यक्ती वैद्यकीय मदतीपासून वंचीत राहण्याची शक्यता आहे. मात्र त्यांना कोणतीही अडचण होऊ नये याकरीता मा.पोलिस अधिक्षक श्री वसंत परदेशी यांचे कल्पनेतून निराधार, जेष्ठ नागरिक व दिव्यांग (अपंग) व्यक्तींचे मदती करीता पोलिस अधिक्षक कार्यालयात विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे. 
पथक प्रमुख म्हणून पोलिस निरिक्षक स्थानीक गुन्हे शाखा, वाशिम शिवाजी ठाकरे (८३८०९६४९९९), सहाय्यक पथक प्रमुख सहा.पो.निरीक्षक अतुन मोहनकर (८३७८९७११०९), सदस्य सहा.पो.उप निरीक्षक भगवान गावंडे (९८५००४९४९१), पो.ना.किशोर चिंचोळकर (९०११४४०९९९), राम नागूलकर (९८५०३९६१००) यांचे नेमणूक करण्यात आली असून जिल्ह्यातील निराधार, जेष्ठ नागरिक व दिव्यांग (अपंग) व्यक्तींना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण झाल्यास वरील पथकातील अधिकारी/कर्मचारी यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन वाशिम जिल्हा पोलिस दलातर्फे करण्यात आले आहे. 
संबंधीत पोलिस स्टेशन मधील बिट मार्शल, पोलिस स्टेशन येथे कर्तव्यावरील पोलिस कर्मचारी, ग्रामीण भागातील बिट पेट्रोलिंग वर असलेले बिट कर्मचारी, निर्भया पथकात नेमणूकीस असलेल्या महिला कर्मचारी यांना निराधार जेष्ठ नागरिक व दिव्यांग (अपंग) व्यक्तींने मदतीसाठी, सर्वतोपरी मदत पोहचविणेबाबत जिल्ह्यातील सर्व ठाणेदार यांना पोलिस अधिक्षक श्री वसंत परदेशी यांनी स्वत: सुचना निर्गमीत केल्या आहेत. 

No comments

Powered by Blogger.