Header Ads

जिल्ह्यात कोरोनाचा एकही संशयित, बाधित रुग्ण नाही


जिल्ह्यात कोरोनाचा एकही संशयित, बाधित रुग्ण नाही
५ जण संस्थात्मक विलगीकरण कक्षात


                  वाशिम (

जनता परिषद 

) दि. २८ : जिल्ह्यात अद्यापपर्यंत कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला एकही संशयित अथवा बाधित रुग्ण आढळलेला नाही. परदेशातून परत आलेल्या ३२ व्यक्तींपैकी ५ व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरण कक्षात, ६ जणांना घरीच विलगीकरण करून निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. मात्र त्यांच्यामध्ये सुद्धा कोणतेही लक्षणे आढलेली नाहीत.


                   उर्वरित २१ व्यक्तींचा १४ दिवसांचा विलगीकरण कालावधी पूर्ण झाला असून त्यांच्यामध्ये कोरोना विषाणू संसर्गाची कोणतीही लक्षणे आढळली नसल्याने त्यांना विलगीकरणाच्या बाहेर करण्यात आले आहे.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.