Header Ads

गर्दी टाळण्यासाठी दुकानदारांनी आपले दुकानांसमोर शिस्तबद्धचे चौकोन आखावे

गर्दी टाळण्यासाठी दुकानदारांनी आपले दुकानांसमोर शिस्तबद्धचे चौकोन आखावे 

कारंजा शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार सतीश पाटील यांचे आवाहन 



कारंजा (प्रति.) दि.२४ - कोरोना च्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण देशच लॉकडाऊन झालेला आहे. प्रत्येक व्यक्तीने आपली सुरक्षा करावी जेणेकरुन पर्यायाने तो स्वत:चे परिवाराची व समाजाची रक्षा करु शकेल असे आवाहन पंतप्रधान नरेंद मोदी व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सह प्रत्येक सुजाण व्यक्ती आता देतो आहे. 
काही काळासाठी लागलेली संचारबंदी हटविल्याबरोबरच किराणा, भाजीपाला किंवा अत्यावश्यक सेवेचे प्रतिष्ठाणांवर मोठी गर्दी होतांना दिसून येते आहे. ही गर्दी रोखणेसाठीच ही संचारबंदी असून ह्याचे मुख्य उद्देशालाच या नागरिकांच्या अति उत्साही गर्दीमुळे तडा जातो आहे. 
यासाठी दुकानदारांनी आपले दुकानाचे समोर शिस्तबद्धतेचे चौकोन आखावे व प्रत्येक नागरिकाने ह्याचे पालन करावे असे आवाहन कारंजा शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार सतीश पाटील यांनी नागरिकांना केले आहे.  जेणेकरुन गर्दीही होणार नाही व प्रत्येक व्यक्तीला त्याची स्वत:ची सुरक्षीतता राखुन योग्य पद्धतीने त्याला आवश्यक असलेला मालही घेता येईल. 
तरी दुकानदार व नागरिकांनीही स्वत:, स्वत:चा परिवार, आप्तेष्ठ व समाजाला वाचविणेसाठी स्वत:ला शिस्तीत ठेवणेसाठी ह्या शिस्तबद्ध चौकोनाचा वापर करावा हि साप्ता.जनता परिषदचे वतीनेही विनंती. 

No comments

Powered by Blogger.